जाहिरात
मराठी बातम्या / Viral / पिल्लाला वाचवण्यासाठी आई स्वतः मगरीसमोर येऊन उभी राहिली अन्.., डोळ्यात पाणी आणणारा VIDEO

पिल्लाला वाचवण्यासाठी आई स्वतः मगरीसमोर येऊन उभी राहिली अन्.., डोळ्यात पाणी आणणारा VIDEO

मगरीचा हरणावर हल्ला

मगरीचा हरणावर हल्ला

या व्हिडिओमध्ये एक हरण आपला गट सोडून तलाव ओलांडू लागतं. ते तलाव वेगाने पार करतं, तेवढ्यात त्या हरणाची आई त्याच्या मागून वेगाने येऊ लागते

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

ीनवी दिल्ली 18 जुलै : जंगलात, लहान प्राण्यांना स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी नेहमी सतर्क राहावं लागतं. कारण मोठे प्राणी कधी त्यांची शिकार करतील, हे सांगू शकत नाही. या प्राण्यांना जमिनीवरच नाही तर पाण्यातही तितकाच धोका असतो. जंगलात धावत असताना हरणाच्या शरीरात प्रचंड ऊर्जा असते. अनेकवेळा पाहायला मिळतं, की चपळ हरणं जमिनीवर असताना आपली शिकार होण्यापासून स्वतःला वाचवतात. मात्र पाण्यात प्रवेश करताच त्यांचा वेग कमी होतो आणि पाण्यात उपस्थित असलेल्या इतर प्राण्यांकडून त्यांची शिकार केली जाते. वन्यजीवांशी संबंधित असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर येत असतात. ज्यामध्ये सिंह किंवा वाघ यासारखे प्राणी जंगलातील इतर प्राण्यांची शिकार करताना दिसतात. मात्र आता एका मगरीने केलेल्या शिकारीचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक हरण आपला गट सोडून तलाव ओलांडू लागतं. ते तलाव वेगाने पार करतं, तेवढ्यात त्या हरणाची आई त्याच्या मागून वेगाने येऊ लागते. तर दुसऱ्या बाजूने एक मगर पहिल्या हरणाची शिकार करण्यासाठी वेगाने जात असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.

जाहिरात

तेव्हाच हरणाची आई मगरीसमोर येते आणि मगर तिचीच शिकार करते. मगर हरणाला पकडून पाण्याखाली घेऊन जाते. व्हिडीओमध्ये पुढे दिसत आहे की, तलावातून बाहेर पडलेलं पहिलं हरण पाण्याकडे बघत आपल्या आईला शोधत आहे. इन्स्टाग्रामवरील वाइल्डलाइफ पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, ‘एक आई आपल्या मुलासाठी स्वत:चा त्याग करते’. अनेकवेळा असे व्हिडिओही पाहण्यात आले आहेत, ज्यामध्ये पाणी पिणाऱ्या हरणांना मगरींनी शिकार केलं आहे. त्याचबरोबर अनेक व्हिडिओंमध्ये हरणाने आपल्या हुशारीने शिकार होण्यापासून स्वतःला वाचवलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात