Home /News /viral /

दरवाजा तोडत रेस्टॉरंटमध्ये घुसला चवताळलेला रेडा आणि...; अंगावर काटा आणणारा थरारक LIVE VIDEO

दरवाजा तोडत रेस्टॉरंटमध्ये घुसला चवताळलेला रेडा आणि...; अंगावर काटा आणणारा थरारक LIVE VIDEO

Buffalo attack video : चवताळलेल्या रेड्याने रेस्टॉरंटमध्ये केला भयंकर हल्ला.

  बीजिंग, 10 जानेवारी : रेडा, म्हैस, बैल हे पाळीव प्राणी पण जर ते चवताळले तर त्यांच्यासमोर येणाऱ्या माणसांचं काही खरं नाही. त्यांच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाला ते तुडवत जातात. असाच एक थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका रेस्टॉरंटमध्ये चवताळलेला रेडा घुसला (Buffalo enters restaurant video) आणि पुढे जे घडलं ते अंगावर काटा आणणारं आहे (Buffalo attack video). रेस्टॉरंटमध्ये घुसत रेड्याने उच्छाद मांडला (China restaurant Buffalo video). त्याच्या मार्गात येणाऱ्या ग्राहकाला शिंगावर धरत हवेत उडवत जमिनीवर आपटलं (Buffalo runs over customer video). त्यानंतर रेस्टॉरंटमधील सामानही उद्ध्वस्त करून टाकलं. ही संपूर्ण घटना रेस्टॉरंटमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडीओ पाहूनच धडकी भरते आहे. व्हिडीओत पाहू शकता एका रेस्टॉरंटमध्ये दोन व्यक्ती उभ्या असलेल्या दिसत आहेत. इतक्यात रेस्टॉरंटच्या दिशेने कुणीतरी पळत येताना दिसतं. एका व्यक्तीचं लक्ष तिकडे जातं. तर दुसरी व्यक्ती आपल्याच कामात व्यस्त असते जिची दरवाजाकडे पाठ असते. हे वाचा - अविश्वसनीय VIDEO! माणसांसमोर जंगलाचा राजा सिंह थरथर कापू लागला, पाहताच ठोकली धूम अवघ्या काही क्षणांतच एक चवताळलेला रेडा दरवाजा तोडत रेस्टॉरंटमध्ये घुसतो. त्याला पाहताच दरवाजापासून थोडी लांब असलेली व्यक्ती मागे पळून जाते. पण त्या अगदी दरवाजासमोर असलेली व्यक्ती या रेड्याच्या मार्गात असते. या व्यक्तीला काही कळायच्या आतच रेडा तिला आपल्या शिंगावर धरून पळत सुटतो. पुढे नेऊन तो त्या व्यक्तीला हवेत उडवत जमिनीवर आदळतो. त्यानंतर मध्येच एक दुसरी व्यक्तीही दिसते जी त्या व्यक्तीच्या बचावासाठी पुढे गेली असावी.
  View this post on Instagram

  A post shared by طبیعت (@nature27_12)

  माणसांवर हल्ला केल्यानंतर रेडा रेस्टॉरंटमधील सामानाचीही नासधूस करतो. टेबल खुर्च्या पाडून तोडतो. त्यानंतर तो पुन्हा दरवाजाजवळ जाऊन थोडा वेळ उभा राहतो आणि मग दरवाजातून बाहेर पडत तिथून पळून जातो. हे वाचा - हा कुत्रा की मांजर? VIDEO पाहून भलेभले कन्फ्युझ; तुम्हाला तरी ओळखता येतं का पाहा nature27_12 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ चीनच्या एका रेस्टॉरंटमधील असल्याचं सांगितलं जातं आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Viral, Viral videos

  पुढील बातम्या