नवी दिल्ली, 29 जून : मगर हा सर्वात धोकादायक शिकारी मानला जातो. कोणताही जीव त्याच्यासमोर आला तर तो त्याला सोडत नाही. अगदी शिकारीला काही कळण्याच्या आतच मगर त्याची शिकार करते. अशाच मगरीच्या शिकारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. पण यात शिकार करायला आलेली मगर स्वतःच शिकार झाली आहे. मगरीच्या शिकारीचा हा व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. कारण शिकार करायला आलेल्या मगरीचाच जीव गेला आहे. पक्ष्याची शिकार करायला म्हणून ही मगर पाण्याबाहेर आली. पण आता तिचाच खेळ संपणार आहे, याची कल्पनाही तिला नव्हती. पोट भरण्यासाठी आली पण दुसऱ्याच्याच पोटात ती गेली. धक्कादायक म्हणजे मगरीची शिकार दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर मगरीनेच केली आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक तलाव दिसत आहे. त्यातून एक मगर हळूच बाहेर येते. तलावाजवळ एक पक्षी उभा आहे. मगर त्या पक्ष्याची शिकार करण्यासाठी म्हणून पाण्यातून बाहेर येते. दबक्या पावलांनी ती पक्ष्याजवळ जाते. पक्ष्यावर हल्ला करून ती आपल्या जबड्यात घेणार तोच मागून एका झुडूपातून दुसरी मोठी मगर येते आणि ती पक्ष्याची शिकार करण्याच्या तयारीत असलेल्या लहान मगरीला आपल्या जबड्यात घेते. Shocking! अवाढव्य मगरीच्या बाजूला झोपली व्यक्ती; VIDEO पाहूनच भरेल धडकी ज्यावेळी मगर मगरीची शिकार करते तेव्हा तो पक्षी तिथंच उभा असतो. शिकारीचा थरार तो पाहत असतो. मोठी मगर छोट्या मगरीला आपल्या जबड्यात घेऊन पुन्हा पाण्यात जाते. @fishinganonymous इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हे दृश्य पाहून लोक आश्चर्यचकीत धाले आहेत. मगरीला मगरीची शिकार करताना पाहून सर्वांना धक्का बसला आहे. मगरी इतर मगरींनाही खातो का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण मगरीला भूक लागली असेल तर ती आपल्या साथीदारांनाही खाते, हे खरं आहे. VIRAL VIDEO - तलावातील मगरींच्या कळपात व्यक्तीने फेकलं मांस, एक मगर मात्र पाण्याबाहेरच आली अन्… दरम्यान या व्हिडीओवर बऱ्याच मजेशीर कमेंटही येत आहेत. पक्षी आणि मगर अनेक वर्षांपासून एकत्र काम करत असल्याचं एका युझरने म्हटलं आहे.
हा व्हिडीओ पाहून तुम्हाला काय वाटतं? तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.