• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • VIDEO: SRH च्या आजी-माजी कॅप्टनची मालदीवमध्ये एकत्र धमाल

VIDEO: SRH च्या आजी-माजी कॅप्टनची मालदीवमध्ये एकत्र धमाल

आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानं (IPL 2021 suspended) सर्व भारतीय खेळाडू घरी परतले आहेत. तर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजचे खेळाडू सध्या मालदीवमध्ये आहेत.

 • Share this:
  मालदीव, 13 मे: आयपीएल स्पर्धा  स्थगित झाल्यानं (IPL 2021 suspended) सर्व भारतीय खेळाडू घरी परतले आहेत. तर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजचे खेळाडू सध्या मालदीवमध्ये आहेत. ऑस्ट्रेलियन खेळाडू 15 मे नंतर मायदेशी परततील. तर न्यूझीलंडचे खेळाडू मालदीवहून इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहेत. मालवदीवमध्ये असलेले सर्व जण सध्या सुट्टीचा आनंद घेत आहेत. केन विल्यमसन (Kane Williamson) आणि डेव्हिड वॉर्नर (David Warner) हे सनरायझर्स हैदराबादचे आजी-माजी कॅप्टन सध्या मालदीवमध्ये आहेत. या दोघांचा बास्केटबॉल (Basketball) एकत्र खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. केन विल्यमसन आणि डेव्हिड वॉर्नर हे दोघंही या व्हिडीओत क्वारंटाईनचा आनंद एकत्र घेताना दिसत आहेत. सनरायझर्स हैदराबादनं हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. या आयपीएल स्पर्धेत डेव्हिड वॉर्नरला काढून त्याच्या जागी केन विल्यमसनची कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.  या सिझनमध्ये हैदराबादची सुरुवात खराब झाली. त्यांचा पहिल्या 3 मॅचमध्ये सलग पराभव झाला. तसंच पहिल्या 6 पैकी फक्त 1 मॅचमध्ये त्यांचा विजय झाला आहे. वॉर्नरनं या काळात बॅट्समन म्हणूनही फार कमाल केली नाही. 6 मॅचमध्ये त्यानं 2 अर्धशतकासह 193 रन केले. त्याचा स्ट्राईक रेट हा फक्त 110.18 इतका होता.  या खराब कामगिरीनंतर वॉर्नरची कॅप्टनपदावरुन हकालपट्टी करण्यात आली. तसंच त्याची टीममधील जागाही गेली. IPL 2021: मुंबईच्या 'सूर्या'नं सांगितला बॅटिंगचा सिक्रेट WTB मंत्र, पाहा VIDEO कॅप्टन बदलल्यानंतरही हैदराबादसमोरच्या अडचणी काही कमी झालेल्या नाहीत. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात हैदराबादचा (SRH vs RR) 55 रननी पराभव झाला आहे. राजस्थानने दिलेलं 221 रनचं आव्हान पार करण्यासाठी आलेल्या हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 165 रन करता आले. आयपीएल स्पर्धा स्थगित झाली, त्यावेळी हैदराबादची टीम पॉईंट टेबलमध्ये सर्वात तळाला होती. स्पर्धेतील सर्व निराशा विसरत हैदराबादचे आजी-माजी कॅप्टन सध्या मालदीवमध्ये एकत्र धमाल करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: