जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / टीम इंडिया विरुद्धच्या टेस्टसाठी 17 सदस्यीय इंग्लंड टीमची घोषणा

टीम इंडिया विरुद्धच्या टेस्टसाठी 17 सदस्यीय इंग्लंड टीमची घोषणा

टीम इंडिया विरुद्धच्या टेस्टसाठी 17 सदस्यीय इंग्लंड टीमची घोषणा

भारतीय महिला टीम (Indians Women Team) इंग्लंडच्या महिला टीम विरुद्ध (England Women Team) एकमेव टेस्ट खेळणार आहे. या टेस्टसाठी इंग्लंडच्या टीमने 17 सदस्यांच्या टीमची घोषणा केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

लंडन, 9 जून: विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्त्वाखालील टीम इंडिया 3 जून रोजी इंग्लंडमध्ये दाखल झाली आहे. या टीमची पहिली टेस्ट 18 जून रोजी न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे. या टेस्टकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलं आहे. या टेस्टच्या दोन दिवस आधी भारतीय महिला टीम (Indians Women Team) इंग्लंडच्या महिला टीम विरुद्ध (England Women Team) एकमेव टेस्ट खेळणार आहे. या टेस्टसाठी इंग्लंडच्या टीमने 17 सदस्यांच्या टीमची घोषणा केली आहे. इंग्लंडच्या टेस्ट टीममध्ये फास्ट बॉलर एमिली एरलॉट (Emily Arlott) पहिल्यांदाच निवड झाली आहे. सेंट्रल स्पार्ककडून खेळणाऱ्या एमिलीनं मागच्या आठवड्यात झालेल्या एका मॅचमध्ये हॅटट्रिक घेतली होती. त्यामुळे तिला टीममध्ये संधी मिळाली आहे. नॅट स्काईवर (Nat Sciver) ही इंग्लंडच्या टीमची व्हाईस कॅप्टन असून हीथर नाईट (Heather Knight) ही कॅप्टन आहे.

जाहिरात

IPL मध्ये कोट्यवधी कमावणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूंनी केली भारतीयांची थट्टा, कारवाई होणार? भारतीय महिला टीम 3 जून रोजीच इंग्लंडमध्ये दाखल झाली आहे. महिला टीम 16 ते 19 जूनपर्यंत एकमेव टेस्ट मॅच खेळणार आहे. तीन मॅचची वन-डे मालिका 27 जून रोजी सुरु होईल. 3 जुलै रोजी तिसरी आणि शेवटची वन-डे असेल. 9 जुलै रोजी टी 20 मालिका सुरू होणार असून 15 जुलै रोजी महिला टीम इंग्लंड दौऱ्याताील शेवटची मॅच खेळणार आहे. भारतीय महिला टीमच्या कोच पदी रमेश पोवार (Ramesh Powar) यांची मागच्या महिन्यात नियुक्ती झाली आहे. पोवार कोच बनल्यानंतर टीम इंडियाची ही पहिलीच सीरिज आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात