मुंबई, 14 फेब्रुवारी : आज Valentine Day आहे आणि हा प्रेमाचा दिवस तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर साजरा करत असाल. पण सर्वांनाच नेहमी लक्षात राहत ते आपलं ‘पहिलं प्रेम.’ Valentine Day ला एकदा तरी हा विचार डोक्यात येतोच की ‘ती सध्या काय करते?’. मग या विचारातून स्वत: मास्टर ब्लास्टर तरी कसा मागे राहणार? अंजली आणि सचिनची जोडी त्याच्या अनेक चाहत्यांची फेव्हरिट आहे. मात्र तुम्हाला हे वाचून धक्का बसेल की अंजली नाही तर दुसरंच कुणीतरी आहे सचिनचं ‘पहिलं प्रेम’. सचिनने आपल्या पहिल्या प्रेमाचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्याला त्याने ‘My First Love’ असं कॅप्शन देखील दिलं आहे. तर ‘क्रिकेट’ हेच आहे आपल्या मास्टर ब्लास्टरचे ‘पहिलं प्रेम’. Valentine Dayचं औचित्य साधत त्याने नेटप्रॅक्टिस करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. 17 हजारांहून जास्त युजर्सनी हा व्हिडीओ पाहिला आहे आणि हजारो सचिन फॅन्सनी त्यावर कमेंट्स देखील केल्या आहेत. भारतामध्ये ‘क्रिकेट म्हणजे सचिन’ असं समीकरण आहे आणि सचिनला खेळताना पाहणं म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणीच असतं. त्यामुळे सचिनने हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर त्यावर अक्षरश: कमेंट्सचा पाऊस पडला.
My First Love! 😀 pic.twitter.com/KsYEYyLaxD
— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 14, 2020
सचिनने निवृत्ती जाहीर केल्यानंतर अनेक क्रिकेट फॅन्सचा हिरमोड झाला होता. पण हा महिना मास्टर ब्लास्टरच्या फॅन्ससाठी अत्यंत आनंदाचा होता. कारण चक्क सचिन बॅट हातात घेऊन मैदानात उतरला होता. 9 फेब्रुवारीला ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज एलिस पॅरीने सचिन तेंडुलकरला आव्हान दिलं होतं. सचिन तेंडुलकरनेही हे आव्हान स्वीकारलं. दरम्यान, इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये टी20चा सामना सुरू असताना सचिनने फलंदाजी केली. सचिन मेलबर्नच्या मैदानावर आपल्या नेहमीच्या अंदाजात उतरला. याआधी सचिन क्रिकेटच्या मैदानावर ज्या शैलीत खेळायचा त्याच शैलीत यावेळीही खेळताना दिसला.
Ellyse Perry bowls 🏏 Sachin Tendulkar bats
— ICC (@ICC) February 9, 2020
This is what dreams are made of 🤩pic.twitter.com/WksKd50ks1

)







