Home /News /viral /

IPL 2021: मनिष पांडे आऊट होताच SRH च्या 'मिस्ट्री गर्ल'चा चेहरा पडला, Video Viral

IPL 2021: मनिष पांडे आऊट होताच SRH च्या 'मिस्ट्री गर्ल'चा चेहरा पडला, Video Viral

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (RCB vs SRH) यांच्यात बुधवारी झालेली लढत अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत थरारक झाली.

    चेन्नई, 15 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (RCB vs SRH) यांच्यात बुधवारी झालेली लढत अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत थरारक झाली. या लढतीममध्ये अखेर आरसीबीनं हैदराबादचा 6 रननं पराभव केला. हैदराबादचा हा या स्पर्धेतील सलग दुसरा पराभव आहे. या मॅच दरम्यान मनिष पांडे (Manish Pandey) आऊट झाल्यानंतर क्रिकेट फॅन्समध्ये 'मिस्ट्री गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेल्या काव्या मारन यांचा चेहरा पडला. त्यांचा दु:खी, कष्टी चेहऱ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Social Media Viral) झाला आहे. आरसीबीचा बॉलर शाहबाज अहमदच्या बॉलवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मनिष पांडे आऊट झाला. तो आऊट होण्यापूर्वी आधीच्याच बॉलवर  जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) आऊट झाला होता. सलग दोन बॉलवर दोन दिग्गज बॅट्समन आऊट होण्याचा धक्का काव्या मारन यांना सहन झाला नाही. मनिष आऊट झालेला पाहताच त्यांचा चेहरा पडला आणि त्यांनी डोक्याला हात लावला. कोण आहेत काव्या मारन? काव्या मारन यांना यापूर्वी देखील हैदराबादच्या मॅचमध्ये टीमला चीयर करताना सर्वांनी बघितलं आहे. त्या सनरायझर्स हैदराबादच्या 'मिस्ट्री गर्ल' म्हणून प्रसिद्ध आहेत. काव्या कलानिधी मारन यांच्या कन्या आहेत. त्या हैदराबाद टीमच्या सीईओ असून सन म्युझिक आणि सन टीव्हीच्या एफएम चॅनलशी देखील निगडित आहेत. काव्या सर्वात पहिल्यांदा 2018 साली आयपीएलमध्ये दिसल्या होत्या. त्याचवेळी त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. 7 वर्षांनंतर विराटच्या टीमनं केली 'ही' कामगिरी! चेन्नईत SRH पुन्हा फेल काव्या अनेकदा आयपीएल ऑक्शनमध्येही दिसल्या आहेत. त्या ऑक्शन टेबलवर व्हीव्हीएस लक्ष्मण आणि टीम मॅनेजमेंटमधील अन्य सदस्यांसोबत उपस्थित असतात. त्याचबरोबर त्या सनराझर्स हैदराबादच्या टीमसोबत प्रवास देखील करतात.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: IPL 2021, RCB, SRH, Viral video.

    पुढील बातम्या