मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: 7 वर्षांनंतर विराटच्या टीमनं केली 'ही' कामगिरी! चेन्नईत SRH पुन्हा फेल

IPL 2021: 7 वर्षांनंतर विराटच्या टीमनं केली 'ही' कामगिरी! चेन्नईत SRH पुन्हा फेल

विराट कोहली (Virat Kohli) कॅप्टन असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (RCB) या आयपीएलमध्ये चांगलाच सूर गवसला आहे. त्यांनी या स्पर्धेत सलग दोन विजय मिळवले आहेत.

विराट कोहली (Virat Kohli) कॅप्टन असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (RCB) या आयपीएलमध्ये चांगलाच सूर गवसला आहे. त्यांनी या स्पर्धेत सलग दोन विजय मिळवले आहेत.

विराट कोहली (Virat Kohli) कॅप्टन असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (RCB) या आयपीएलमध्ये चांगलाच सूर गवसला आहे. त्यांनी या स्पर्धेत सलग दोन विजय मिळवले आहेत.

    चेन्नई, 15 एप्रिल: विराट कोहली (Virat Kohli) कॅप्टन असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (RCB) या आयपीएलमध्ये चांगलाच सूर गवसला आहे. त्यांनी या स्पर्धेत सलग दोन विजय मिळवले आहेत. बुधवारी झालेल्या थरारक मॅचमध्ये आरसीबीनं सनरायझर्स हैदराबादचा (SRH) 6 रननं पराभव केला. आरसीबीनं यापूर्वी स्पर्धेतील पहिल्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा 2 विकेट्सनं पराभव केला होता. चेन्नईमध्ये झालेल्या या मॅचमध्ये आरसीबीनं पहिल्यांदा बॅटींग करताना 8 आऊट 149 रन काढले. त्याला उत्तर देताना हैदराबादच्या टीमला 9 आऊट 143 रनच बनवता आले. शेवटच्या चार ओव्हरमध्ये खराब खेळण्याचा फटका हैदराबादला बसला. या विजयाबरोबरच आरसीबीनं सात वर्षांपूर्वीच्या त्यांच्या कामगिरीची बरोबरी केली आहे. आरसीबीनं आयपील स्पर्धेत तब्बल 7 वर्षांनी सलग दोन मॅच जिंकल्या आहेत. यापूर्वी त्यांनी ही कामगिरी 2014 साली केली होती. सनरायझर्स हैदराबादसाठी चेन्नईचं मैदान पुन्हा एकदा अपयशी ठरलं आहे. हैदराबादची टीम या मैदानात सलग पाचव्यांदा पराभूत झाली आहे.  पहिल्या मॅचमध्ये त्यांचा कोलकाता नाईट रायडर्सनं 10 रननं पराभव केला होता. सलग दोन पराभवामुळे हैदराबादची टीम सध्या पॉईंट टेबलमध्ये (Point Table) शेवटून दुसऱ्या म्हणजेच सातव्या क्रमांकावर आहे. तर आरसीबीची टीम सलग दोन विजयासह पहिल्या क्रमांकावर आहे. शाहबाज अहमदच्या (Shahbaz Ahmed) एकाच ओव्हरमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या दिशेनं असलेली मॅच  विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या (RCB) दिशेनं झुकवली. पहिल्या मॅचचा हिरो असलेल्या हर्षल पटेलनं (Harshal Patel) शेवटच्या ओव्हरमध्ये दबावात चांगली बॉलिंग केली. आरसीबीकडून शाहबाज अहमदनं सर्वात जास्त 3 विकेट्स घेतल्या. त्याला मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट्स चांगली साथ दिली. हैेदराबादकडून त्यांचा कॅप्टन डेव्हिड वॉर्नरनं सर्वात जास्त 54 रन काढले. त्याचं हे आयपीएल कारकीर्दीमधील 49 वं अर्धशतक आहे. IPL 2021: 'कोहलीसारखा कॅप्टन पहिल्यांदाच पाहिला', वाचा गंभीर असं का म्हणाला? ग्लेन मॅक्सवेलचं (Glenn Maxwell) अर्धशतक हे आरसीबीच्या इनिंगचं वैशिष्ट्य ठरलं.  मॅक्सवेलनं  फोर आणि 3 सिक्सच्या मदतीनं 59 रन काढले. या अर्धशतकासोबतच मॅक्सवेलनं आयपीएलमधील एक मोठा दुष्काळ संपवला आहे. त्यानं 40 मॅच आणि 5 वर्षांनंतर आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावलं आहे. मॅक्सवेललाच 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Glenn maxwell, IPL 2021, RCB, SRH, Virat kohli

    पुढील बातम्या