मुंबई, 17 मे: टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) याचा प्रभाव पडलेले अनेक क्रिकेटपटू जगभर आहेत. फक्त पुरुष खेळाडूंवरच नाही तर महिला क्रिकेटपटूंवरही धोनीचा मोठा प्रभाव आहे. झारखंडची विकेट किपर बॅट्समन इंद्राणी रॉय (Indrani Roy) त्यापैकीच एक. इंद्राणीची पहिल्यांदाच टीम इंडियात निवड झाली आहे. इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या 1 टेस्ट 3 वन-डे आणि 3 टी20 मालिकेसाठी इंद्राणीची टीममध्ये निवड झाली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्याचा फायदा तिला झाला आहे. तिनं यावर्षी झालेल्या स्पर्धेत 8 मॅचमध्ये 76 च्या सरासरीनं सर्वात जास्त 456 रन काढले होते. यामध्ये दोन शतक आणि एक अर्धशतकाचा समावेश होता.
इंद्राणी रॉयनं 'स्पोर्ट्सस्टार' शी बोलताना सांगतलं की, "रांचीमध्ये मागच्या वर्षी झालेल्या ट्रेनिंग सेशनच्या वेळी माझी माही सरांशी (महेंद्रसिंह धोनी) सविस्तर चर्चा झाली. त्यांनी खेळातील सुधारणेबाबत काही टिप्स दिल्या. त्याचा मला फायदा होत आहे. माही सरांसारख्या दिग्गजाकडून शिकायला मिळणं ही सन्मानाची गोष्ट आहे. त्यांनी दिलेल्या सल्ल्यामुळेच माझ्या खेळात सुधारणा झाली आहे. आता प्रत्येक वेळी मैदानात उतरल्यानंतर मी त्यांनी दिलेल्या टिप्स लक्षात ठेवते."
आगामी टेस्ट सीरिजपूर्वी इंग्लंडला धक्का, 'हा' दिग्गज खेळाडू आऊट
कठोर मेहनतीचं फळ
भारतीय टीममध्ये जागा मिळवण्यासाठी या विकेट किपर बॅट्समननं कठोर मेहनत केली आहे. "माझा टीम इंडियासोत पहिलाच दौरा आहे. मला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळाली तर मी सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करेन. न्यूझीलंडमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या वन-डे वर्ल्डकपसाठी हा दौरा महत्त्वाचा आहे."असं इंद्राणीनं यावेळी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.