नवी दिल्ली 09 जानेवारी : आजकाल सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ आपणास पाहायला मिळतात. बऱ्याचदा असे व्हिडिओ पाहिल्यानंतर हसावं की रडावं, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. पण आज आम्ही तुम्हाला सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका गायीच्या व्हिडिओबद्दल सांगणार आहोत, जो पाहिल्यानंतर पृथ्वीवरील सर्वांत हुशार प्राणी गाय तर नाही ना? असं वाटल्याशिवाय राहणार नाही.
इंटरनेटचं जग खूप विचित्र आहे. इथे कधी काय बघायला मिळेल, हे सांगता येत नाही. इंटरनेट, सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडिओ कधी तुम्हाला हसवतात तर कधी आश्चर्यचकित करतात. नुकताच असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. खरं तर, माणसाला पृथ्वीवरील सर्वांत बुद्धिमान प्राणी मानलं जातं, परंतु असे काही प्राणी आहेत, जे बुद्धीच्या बाबतीत मानवांपेक्षा अधिक हुशार आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हे नक्कीच पटेल. कारण या व्हिडिओमध्ये एक गाय अत्यंत हुशारीनं स्वत:ला कशी सोडवते, हे तुम्हाला पाहायला मिळेल.
किराणा दुकानातच 2 उंदरांची जबर 'मारामारी'; कधीही पाहिला नसेल असा VIDEO
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @TheFigen_ नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्याला ‘व्हेरी स्मार्ट’ असं कॅप्शन देण्यात आलं आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 420.1K व्ह्यूज मिळालेत, तर 22 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केलं आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स त्यावर एकापेक्षा एक कमेंट देत आहेत. एका यूजरनं लिहिलं, 'माझे इंग्रजीचे शिक्षक नेहमी म्हणायचे... एक भाषा (जीभ) तुमच्यासाठी दरवाजे उघडते.' दुसऱ्या यूजरनं लिहिलं की, 'याला (पृथ्वीला) माणसांचा नाही तर गायींचा ग्रह घोषित करायला हवं.' आणखी एका यूजरनं लिहिलं की, 'गरज ही शोधाची जननी आहे, जीभ ही चावी आहे.'
Very smart! 💞😂 pic.twitter.com/q5LcbAczVU
— Figen (@TheFigen_) January 6, 2023
व्हिडिओमध्ये नेमकं काय?
व्हायरल झालेल्या या व्हिडिओतील गायीची हुशारी पाहून तुमचेही डोळे विस्फारतील. व्हिडिओतील गायीची बुद्धी सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी आहे. स्वतःला सोडवण्यासाठी लोखंडी सळयांच्या आत कैद झालेली ही गाय जीभेच्या साहाय्याने दरवाजाची कडी उघडून बाहेर कशी पडते, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. इंटरनेटवर प्राण्यांशी संबंधित एकापेक्षा एक व्हिडिओ पाहायला मिळतात. पण नुकताच व्हायरल झालेला हा गायीचा व्हिडिओ लोकांना खूपच आवडत आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पाहण्यास मिळतात. पण त्यातही प्राण्यांशी संबंधित असे मजेदार व्हिडिओ असतील, तर त्याला लोकांची पसंतीही चांगली मिळतेय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.