जाहिरात
मराठी बातम्या / Viral / अग्निशमन दलाच्या जवानाला गायीनं शिंगावर धरून आपटलं, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

अग्निशमन दलाच्या जवानाला गायीनं शिंगावर धरून आपटलं, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

अग्निशमन दलाच्या जवानाला गायीनं शिंगावर धरून आपटलं, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

संतापलेल्या गायीनं एका अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यावर हल्ला केला आहे. या गायीनं जवानाचा पाठलाग करून त्याला शिंगाने धरून आपटलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 02 डिसेंबर : अनेकदा भटक्या जनावरांनी नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटना समोर येत असतात बरेचदा अग्निशमन दलाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो आणि त्यातच भटक्या जनावरांचा हल्ल्याचा सामना करावा लागल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाची आणि आपत्कालीन कामगरांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत असतो. कधीकधी ते अशा विचित्र परिस्थितीतही अडकलेले असतात. ऑस्ट्रेलियामधील न्यू साउथ वेल्सच्या या अग्निशमन दलाल एक विचित्र घटनेचा सामना करावा लागला. हा व्हिडीओ पाहून युझर्सना देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे. संतापलेल्या गायीनं एका अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यावर हल्ला केला आहे. या गायीनं जवानाचा पाठलाग करून त्याला शिंगाने धरून आपटलं आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

हे वाचा- वर्षभर फेसबुकवर रंगली लव्हस्टोरी, जातीमुळे लग्नास नकार देणे तरुणाला पडले भारी फायर अॅण्ड रेस्क्यू एनएसडब्ल्यू स्टेशन 082 रिचमंड या फेसबुकवर पेजवर याचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की अग्निशमन दलाच्या जवानामागे गाय लागली आहे. या जवानाला ती पळवत आहे. अचानक ही भटकी गाय त्याच्यावर हल्ला करते आणि त्याला खाली पाडते आणि तिथून पुढे निघून जाते. या गायीला कशामुळे राग आला आणि तिथे का हल्ला केला याचं कारण अद्याप समजू शकलं नाही. सोशल मीडियावर मात्र हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. फक्त भटक्या गायींपासून पिछा सोडवण्याव्यतिरीक्त आम्ही सर्व गोष्टींसाठी तयार आहोत असं कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या अग्निशमन दलाच्या जवानाकडे काहीतरी लाल रंग असल्याचं दिसलं आणि गायीचा संताप अनावर झाला असं देखील सांगण्यात आलं आहे. त्यामुळे हा प्रकार घडला असावा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात