चेन्नई, 13 ऑगस्ट : देव तारी त्याला कोण मारी, अशी म्हण मराठीत प्रचलित आहे. मात्र ही बातमी वाचून, या म्हणीची खरा अर्थ कळतो. कधी कधी काही लोकं देवाप्रमाणे मदतीसाठी धावून येतात. असाच काहीचा प्रकार तमिळनाडूमध्ये घडला. तामिळनाडूमधील अदानुराई (Adanurai ) येथील तीन महिलांनीही असेच काहीसे केले. या महिलांनी आपल्या साड्यांच्या मदतीने दोन तरुणांचे प्राण वाचवले. सध्या सोशल मीडियावर या महिला चर्चेचा विषय ठरत आहेत. देशभरातून या महिलांचे कौतुक केले जात आहे. ही घटना 6 ऑगस्ट रोजी घडली. तमिळनाडूतील कोट्टारइ डॅमजवळ काही मुलं क्रिकेट खेळत होती. क्रिकेट खेळल्यानंतर यातील 4 मुलं आंघोळीसाठी डॅममध्ये गेली. मात्र पावसामुळे अचानक पाण्याची पातळी वाढली, आणि मुलं बुडायला लागली. मुलं बुडत असल्याचे डॅमजवळ असलेल्या तीन महिलांनी पाहिलं. अशा परिस्थितीत काय करावं हे त्यांना कळलं नाही, अखेर त्यांनी आपल्या साड्या सोडल्या आणि मुलांचा जीव वाचवला. या महिलांना साडी सोडून ती डॅममध्ये फेकली, आणि मुलांना बाहेर काढले. वाचा- बुडत्याला जेसीबीचा आधार, रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO जेव्हा ही मुलं पाण्यात बुडत होती तेव्हा Adanurai, Senthamizh Selvi, Muthamaal आणि Ananthavalli डॅमजवळ कपडे धूत होत्या. न्यू इंडियन एक्सप्रेमसला घटनास्थळी उपस्थित असलेल्या Senthamizh Selvi या महिलेने सांगितले की, “काही मुलं डॅमजवळ पोहचली तेव्हा आम्ही घरी जात होतो. आम्ही या मुलांना पाणी खूप खोल आहे, जाऊ नका, असेही सांगितले”. पावसामुळे डॅम जवळ असलेल्या या कालव्याची पातळी 15 ते 20 फूटांनी वाढली होती. वाचा- प्रसिद्ध वेटलिफ्टरनं उचललं 400 किलोचं वजन,एका सेकंदात अशी झाली गुडघ्यांची अवस्था त्यांनी सांगितले की आम्ही आमची साडी सोडली आणि कसलाही विचार न करता मुलांना वाचवण्यासाठी प्रयत्न करू लागलो. आम्ही दोघांचे प्राण वाचवू शकलो तोपर्यंत उर्वरित दोघांचा बुडून मृत्यू झाला होता. एकूण चार मुलं पाण्यात उतरली होती, यातील दोन मुलं पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेली, त्यांचा बुडून मृत्यू झाला. तर, दोन मुलांना वाचवण्यात या महिलांना यश आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







