मुंबई, 02 जुलै : स्टंट म्हटलं की आपल्याला बाईक किंवा कारचा आठवतो. पण साऊथ सिनेमांमध्ये दाखवला जातो अगदी तसा बाईकपासून रिक्षापर्यंत आणि ट्रॅक्टरपासून सैनिकांच्या जीपपर्यंत अनेक गाड्यांवरचे स्टंट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. याला कारणही तेवढंच खास आहे. भारत-चीन लडाखमधील सीमारेषेवरील तणावानंतर आता भारतानं चीनविरोधात काही ठोस पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. 59 चायनीज अॅपवर बंदी घालण्यात आली. चीन वस्तूंवर बंदी घालण्यात आल्यानंतर आता चीननं नवीन चाल खेळत सायबर हल्ला करण्याचा प्लॅन केला मात्र तोही यशस्वी न करण्यासाठी भारतीय यंत्रणा सज्ज आहेत. याच दरम्यान चीनच्या सैनिकांनी कार आणि जीपसोबत केलेले स्टंट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या स्टंटबाजीला उत्तर देण्यासाठी भारतीय नागरिकांनी काही भन्नाट स्टंटचे व्हिडीओ रिट्वीट किंवा रिशेअर केले आहेत.
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता चीनचे सैनिक जीप आणि कारचे स्टंट करत आहेत. त्यांच्या या स्टंटचा व्हिडीओ ट्वीटरवर 1.1 मिलियन लोकांनी पाहिला आहे. या चीनच्या स्टंटबाजीला भारतीय नागरिकांनीही भन्नाट स्टंटचे व्हिडीओ कमेंटमध्ये शेअर करून उत्तर दिलं आहे.
Amazing driving skills of Indian Auto drivers, It's better than your #PLA soldiers #China 👍 pic.twitter.com/ZjwRNlHrrs
— Mr_Perfect (@GauravjainTweet) July 1, 2020
गूगल वाले तो अब बना रहे है बिना ड्राइवर की गाड़ी
— Heman 🇮🇳 (@Heman_Soni00) June 27, 2020
इंडिया में बरसों से घूमती है ये pic.twitter.com/i9i5FuJegE
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की रिक्षा आणि दुचाकीवर लोकांनी कसे भन्नाट स्टंट केले आहेत. दोन चाकांवर रिक्षा चालवण्यापासून ते दुचाकीवर सिलेंडर ठेवून त्यावर बसून दुचाकी चालवण्यापर्यंतचे स्टंट सोशल मीडियावर कमेंटमध्ये पोस्ट करण्यात आले आहेत.
हे कमी काय तर चक्क ट्रॅक्टरची स्टंटबाजी सोशल मीडियावर चायनाच्या सैनिकांच्या स्टंटला उत्तर म्हणून शेअर करण्यात आली आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की एक तरुण ट्रॅक्टर शेवटच्या दोन चाकांवर उभा करून गोल गोल फिरवताना आपल्याला दिसत आहे. संकलन, संपादन- क्रांती कानेटकर

)







