जाहिरात
मराठी बातम्या / Viral / फ्लाइटमध्ये मिळाली अशी ऑफर की त्याने बायकोलाही सोडलं; तिला एकटं ठेवून पळाला नवरा

फ्लाइटमध्ये मिळाली अशी ऑफर की त्याने बायकोलाही सोडलं; तिला एकटं ठेवून पळाला नवरा

फ्लाइटमध्ये मिळाली अशी ऑफर की त्याने बायकोलाही सोडलं; तिला एकटं ठेवून पळाला नवरा

फ्लाइटमध्ये नवऱ्याच्या कृत्यामुळे बायको झाली संतप्त.

  • -MIN READ
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 11 फेब्रुवारी : नवरा-बायको (Husband wife news) म्हणजे एकमेकांचे आयुष्याचे सोबती. जीवनाच्या प्रवासात ते एकत्र असतात. सुखदुःखात कायम एकमेकांची साथ देतात. लग्नाच्या वेळी सात जन्म सोबत राहण्याचं वचन देतात. पण एका नवरा मात्र प्लेनमधील एका ऑफरमुळे हे सर्वकाही विसरलं. फक्त एका ऑफरसाठी त्याने विमान प्रवासात आपल्या बायकोची साथ सोडली. तिला एकटं टाकून तो पळाला (Husband left wife alone for offer in flight). हे कपल एकत्र सुट्ट्या एन्जॉय करायला निघालं. महिनाभरासाठी ते जपानहून अमेरिकेला जात होतं. आता नवरा-बायको एकत्र प्रवास करणार म्हणजे त्यांनी काही ना काही रोमँटिक स्वप्नं रंगवलेलीच असतात. पतीसोबत प्रवासाला निघालेल्या या महिलेनेही अशीच स्वप्नं रंगवली होती. पण तिच्या पतीने ही स्वप्नं धुळीत मिळवली आणि याला कारण ठरलं विमान प्रवासात त्याला मिळालेली एक ऑफर. तब्बल 12 तासांचा हा विमान प्रवास होता. दोघंही फ्लाइटच्या इकोनॉमी क्लासमध्ये प्रवास करत होते. प्रवासाची सुरुवात आनंदात झाली.  पण मध्येच एक ऑफर आली. पतीला आपली सीट अपग्रेड करून बिझनेस क्लासमध्ये बसून प्रवास करण्याची संधी मिळाली. हे वाचा -  समुद्रकिनारी घर काय फक्त 50 लाखांत हा संपूर्ण बीच तुमचा; पूर्ण करावी लागेल एक अट मग काय पतीने या सुवर्णसंधीचा फायदा घ्यायचं ठरवलं. त्याने मागचापुढचा कोणताच विचार केला नाही आणि इकोनॉमी क्लास सोडून बिझनेस क्लासमधून प्रवास करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे तो आपल्या बायकोपासून वेगळा झाला, तिच्यापासून दूर बसला. आपली बायको एकटी राहिला याचं त्याला काहीच वाटलं नाही. साहजिक फक्त एका नको त्या ऑफरसाठी आपल्या पतीने प्रवासात असं आपल्याला एकटीला सोडलं, हे कोणत्याच महिलेला सहन होणार नाही. ही महिलाही तशीच संतप्त झाली. नवऱ्यासोबत 12 तास एकत्र विमान प्रवास करणार अशी प्लॅनिंग पत्नीने केली. पण पतीला बिझनेस क्लासची भुरळ पडल्याने तिचा हा प्लॅन फेल झाला. तिचा पूर्ण प्रवास खराब झाला. हे वाचा -  OMG! 13 वर्षीय मुलाने एकट्यानेच बनवले इतके पदार्थ; फक्त आकडा वाचूनच चक्कर येईल पतीच्या मते, 12 तासांचा फ्लाइटचा प्रवास हा रात्रीचा होता. आम्ही दोघंही झोपलोच असतो. त्यामुळे वेगवेगळं बसल्याने तसा काहीच फरक पडत नाही. त्याने आपला हा प्रवास रेडिटवर शेअर केला आहे आणि लोकांचं मत जाणून घेतलं. बहुतेक युझर्सनी त्याच्या पत्नीलाच योग्य ठरवलं आहे. पत्नीला प्रवासात असं एकटं सोडून गेल्याने त्याची चांगलीच शाळा घेतली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात