नवी दिल्ली 06 डिसेंबर : सोशल मीडियावर वेडिंग फोटोशूटचा एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल. या वेडिंग फोटोशूटदरम्यान (Wedding Photoshoot Ideas) एका कपलचा जीव थोडक्यात वाचला. घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी या कपलला सल्ले देण्यास सुरुवात केली आहे. आपलं प्री-वेडिंग फोटोशूट आगळंवेगळं करण्यासाठी या कपलने जे काही केलं ते पाहून कोणीही थक्क होईल (Shocking Pre-Wedding Photoshoot Video). या कपलने आपल्या लग्नाच्या फोटोशूटसाठी एकदम वेगळी जागा निवडली. कपल फोटोशूटसाठी विमानाच्या समोर गेलं. तुम्ही पाहू शकता, की अगदी सजून फोटोशूटसाठी उभा असलेल्या या कपलच्या डोक्याच्या वरुनच प्लेन जाताना दिसतं. हे दृश्य पाहून कोणालाही भीती वाटेल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की लग्नाच्या पोशाखात नवरी आणि नवरदेव एका अनोख्या ठिकाणी गेले आहेत. नवरी आणि नवरदेवासोबत अनोखे फोटो काढण्यासाठी फोटोग्राफरही तयार आहे. नवरीबाई व्हाईट वेडिंग ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. तर नवरदेवानेही व्हाईट सूट घातलेला आहे.
व्हिडिओमध्ये पुढे तुम्ही पाहू शकता की दोघंही पोज देण्यासाठी तयार आहेत. इतक्यात त्यांच्या मागून एक प्लेन येतं. हे विमान त्यांच्या डोक्याच्या अगदी जवळून उडतं. प्लेन तिथून जाताच सगळेकडे धूर पसरल्याप्रमाणे चित्र दिसतं. यानंतर नवरी आणि नवरदेवाची अवस्था पाहण्यासारखी होते. नंतर दोघंही हसताना दिसतात मात्र विमान शेजारून जाताना त्यांच्या हृदयाचे ठोके नक्कीच वाढले असणार. अंगावर काटा आणणारं हे वेडिंग फोटोशूट सध्या चांगलंच व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर bride_buzz नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ पोस्ट केला गेला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 82 लाखहून अधिकांनी पाहिला आहे.