पणजी, 23 मार्च : देशात कोरोनानं थैमान घातलं आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा देशात 415 वर गेला आहे. त्या पार्श्वभूमीवर 22 राज्यांसह 80 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 09 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं होतं. त्यानुसार देशभरात काल हा कर्फ्यू सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत कर्फ्यू पाळला जात होता. त्याच दरम्यान एक तरुण गाडीवरून शायनिंग मारत जात असताना त्याला रस्त्यावर पोलिसांनी अडवलं. त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला मात्र हा तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नाही हे पाहून पोलिसांनी चांगलीच शिक्षा दिली.
कर्फ्यू हा नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि आरोग्याची काळजी आहे म्हणून पाळण्यात आला आहे. याचं गांभीर्यच जर कळत नसेल आणि सरकारच्या आदेशाचं उल्लंघन केलं जात असेल तर अशा पद्धतीची कारवाई करणं गरजेचं असल्याचं युझर्सनी व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर म्हटलं आहे.
भारतात कोरोनामुळे आतापर्यंत 09 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान कोरोना वाढता धोका लक्षात घेऊन सरकारनं लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. व्हायरल झालेला हा व्हिडीओ गोव्यातील असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांच्या कारवाईला युझर्सनीही पाठिंबा दिला आहे.