जाहिरात
मराठी बातम्या / Viral / गजब ! चक्क बांधलं कोरोना देवीचं मंदिर, मूर्ती स्थापन करुन केली पूजा

गजब ! चक्क बांधलं कोरोना देवीचं मंदिर, मूर्ती स्थापन करुन केली पूजा

गजब ! चक्क बांधलं कोरोना देवीचं मंदिर, मूर्ती स्थापन करुन केली पूजा

Corona Mata Temple: कोरोनामुळे उत्तर प्रदेशमध्ये भयानक परिस्थिती निर्माण झाली होती. आता उत्तर प्रदेशमध्ये चक्क कोरोना नावाचं मंदिर (Corona Mandir) बांधण्यात आलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

उत्तर प्रदेश, 13 जून: कोरोना व्हायरस (Corona Virus) नं संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. भारत देशही कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. कोरोनामुळे उत्तर प्रदेशमध्ये भयानक परिस्थिती निर्माण झाली होती. आता उत्तर प्रदेशमध्ये चक्क कोरोना नावाचं मंदिर (Corona Mandir) बांधण्यात आलं. या मंदिराला कोरोना देवी मंदिर असं नावही देण्यात आलं. या मंदिरात एका मूर्तीची स्थापना केली असून लोकांनी पूजा करण्यासही सुरुवात केली. या मूर्तीला मास्कही लावण्यात आला होता. इतंकच काय तर जेथे मंदिर बांधण्यात आलं आहे. तिथे दान म्हणून काय टाकावं आणि काय टाकू नये. हे देखील लिहण्यात आलं आहे. या मंदिरात एक पुजारीही नियुक्त करण्यात आला आहे. हे कोरोना देवीचं (Corona Temple) मंदिर उत्तर प्रदेशातल्या प्रतापगढमध्ये बनवण्यात आलं. जिल्हा मुख्यालय प्रतापगढ (Pratapgarh News) हून 50 किलोमीटर लांब जूही शुक्लपूर गावात हे मंदिर बांधलं. हेही वाचा-  दुर्मिळ आजारानं ग्रासलेल्या अयांशला दिलं तब्बल 16 कोटींचं औषध दरम्यान आता पोलिसांनी हे मंदिर तोडून टाकलं आहे. जेसीबीच्या साहाय्यानं हे मंदिर पूर्णपणे हटवण्यात आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी एका ग्रामस्थालाही ताब्यात घेतलं आहे. पोलीस सध्या त्याची चौकशी करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात