हैदराबाद, 13 जून: स्पाइनल मस्क्यूलर एट्रोफी (SMA) या दुर्मिळ आजाराने ग्रासलेल्या हैदराबाद येथील तीन वर्षीय अयांशला जगातलं सर्वात महागड्या औषधांपैकी एक जोल्गेन्स्मा (Zolgensma) देण्यात आलं आहे. अयांशच्या आई-वडिलांनी हे औषध तब्बल 16 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. हे पैसे त्यांनी क्राउड फंडिंगच्या माध्यमातून एकत्रित केले आहे. या औषधासाठी 65 हजार लोकांनी पैसे दान केलेत.
जोल्गेन्स्मा हे औषध अमेरिकेच्या नोवार्टिस येथून इंपोर्ट होऊन भारतात 8 जूनला पोहोचलं. याआधी केंद्र सरकारनं या औषधावरील इंपोर्ट ड्यूटी माफ केली होती. यासह GSTमध्येही सूट देण्यात आली होती. अन्यथा औषधाची किंमत 6 कोटींनी वाढली असती.
65 हजार लोकांकडून मदतीचा हात
अयांशचे आई-वडील, योगेश गुप्ता आणि रुपल गुप्ता यांनी 4 फेब्रुवारीपासून क्राउड फंडिंगच्या माध्यमातून पैसे गोळा करण्यास सुरुवात केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी मदत करण्याची विनंती केली होती. त्यासोबतच त्यांनी फंडिंग गोळा करण्यासाठी सोशल मीडियावर एक मोहिम सुरु केली.
हेही वाचा- सिमकार्डची तस्करी करणाऱ्या चिनी गुप्तहेरा संदर्भात धक्कादायक माहिती समोर
योगेश गुप्ता हे हैदराबादमध्ये एक खासगी कंपनीत कामाला आहेत. एवढी रक्कम गोळा करणं त्यांना शक्य नव्हतं. क्राउड फंडिंगद्वारे त्यांनी मदतीचा हात मागितला. 65 हजारांहून अधिक लोकांनी त्यांना मदत केली आहे. ज्यात बॉलिवूड कलाकारांपासून क्रिकेटर्सचा समावेश आहे.
दोन वर्षांपूर्वी आजाराचं निदान
अयांशचे वडील योगेश गुप्ता यांनी सांगितलं, सिकंदराबादच्या विक्रमपुरी येथील रेनबो चिल्ड्रेन रुग्णालयात बुधवारी सकाळी अयांशला औषध देण्यात आलं.
रेनबो रुग्णालयाचे डॉक्टर रमेश यांनी सांगितलं, जेव्हा अयांश 7 ते 8 महिन्याचा होता. तेव्हा या आजारासंबंधी समजलं. ज्यावेळी अयांश एक वर्षांचा होता. तेव्हा त्याच्या उपचारावर चर्चा सुरु केली होती. हा आजारातून बरं होण्यासाठी तीन प्रकारचं औषध आहे. मात्र हे औषध भारतात उपलब्ध नाही आहे. परदेशातून त्याची आयात करावी लागते. त्यामुळे अयांशच्या पालकांनी क्राउड फंडिंगच्या माध्यमातून या औषधाची पूर्ण रक्कम गोळा केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Hyderabad, Photo viral