मराठी बातम्या /बातम्या /Viral /प्रचंड गाजलेला मेडिकल कॉलेजमधील Dance Video पुन्हा चर्चेत, का ठरतोय वादाचा मुद्दा?

प्रचंड गाजलेला मेडिकल कॉलेजमधील Dance Video पुन्हा चर्चेत, का ठरतोय वादाचा मुद्दा?

सोशल मीडियावर (Social Media) अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल (Viral Dance Video) होताना पाहायला मिळतात. असाच केरळमधील दोन मेडिकल स्टूडंटचा डान्स व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर (Social Media) अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल (Viral Dance Video) होताना पाहायला मिळतात. असाच केरळमधील दोन मेडिकल स्टूडंटचा डान्स व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर (Social Media) अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल (Viral Dance Video) होताना पाहायला मिळतात. असाच केरळमधील दोन मेडिकल स्टूडंटचा डान्स व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

नवी दिल्ली 12 एप्रिल: सोशल मीडियावर (Social Media) अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल (Viral Dance Video) होताना पाहायला मिळतात. या व्हिडीओला लोकांची मोठी पसंती मिळत असल्याचंही पाहायला मिळतं. असाच आणखी एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी समोर आला आहे. हा व्हिडीओ केरळमधील दोन मेडिकल स्टूडंटचा आहे. व्हिडीओमध्ये दोघंही 1978 मधील हीट रासपुतिन गाण्यावर डान्स करत आहेत. यातील एका विद्यार्थ्याचं नाव नवीन के रजाक तर विद्यार्थीनीचं नाव जानकी ओमकुमार असं आहे. दोघंही त्रिसूर मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आहेत. डान्स व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दोघंही चर्चेत आले आहेत. दोघांनी हा व्हिडीओ कॉलेजच्या परिसरातच बनवला आहे.

हा डान्स व्हिडीओ सर्वात आधी 23 मार्चला इंटरनेटवर अपलोड झाला होता. हा व्हिडीओ लोकांच्या इतका पसंतीस उतरला की लोकांनी मोठ्या संख्येत तो शेअर केला आणि हजारो वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला. परंतु, मागील दोन दिवसात काही लोक याला वेगळंच वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत. या व्हिडिओमध्ये पाहिल्या गेलेल्या मुलाचं नाव नवीन के रजाक असं आहे. याच कारणामुळे अनेकांनी या दोघांवर टीका केली आहे.

या डान्स व्हिडीओबाबत अनेकांनी ट्विटर आणि फेसबुकवरही लिहिलं आहे. कृष्णा राज नावाच्या एका फेसबुक युजरनं लिहिलं, की जानकी आणि नवीन. त्रिसूर मेडीकल कॉलेजच्या या दोन्ही विद्यार्थ्यांचा डान्स व्हिडीओ भरपूर व्हायरल झाला आहे. यांचं पूर्ण नाव जानकी ओमकुमार आणि नवीन के रजाक असं आहे. यात काही शंका नक्कीच आहेत. जानकीच्या पालकांनी अधिक सावध राहाणं गरजेचं आहे. चला जानकीच्या नवऱ्यासाठी आणि नवीनच्या बायकोसाठी प्रार्थना करू.

फेसबुकवर करण्यात आलेल्या पोस्टनंतर लोकांमध्ये यावरुन वाद सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. लोक आता हे ठरवत आहेत, की विद्यार्थ्यांचं समर्थन करावं की कृष्णा राजचं. काही लोक कृष्णा राजच्या म्हणण्याबाबत सहमत आहेत. त्यांनी लिहिलं, की ही एका समुदायाकडून विचारपूर्वक ठरवून केलेली घटना आहे. मात्र, सोशल मीडियावरील अनेक वापरकर्ते या दोन विद्यार्थ्यांचीच बाजू घेत असल्याचं चित्र आहे. शुक्रवारी कॉलेज यूनियननं गाण्यावर इतरही अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. यासोबतच विरोध करणाऱ्यांसाठी ते म्हणाले, 'जर तुमचा हेतू द्वेष असेल तर आम्ही यात अडथळा आणण्याचं ठरवलं आहे.

First published:

Tags: Dance video, Private medical colleges, Social media viral, Video viral