जाहिरात
मराठी बातम्या / Viral / कमरेपासून जोडल्या गेल्यात या जुळ्या बहिणी; एक सिंगल, तर एक रिलेशनशिपमध्ये, रोमान्स करतानाही...

कमरेपासून जोडल्या गेल्यात या जुळ्या बहिणी; एक सिंगल, तर एक रिलेशनशिपमध्ये, रोमान्स करतानाही...

कमरेत जोडल्या गेल्यात जुळ्या बहिणी

कमरेत जोडल्या गेल्यात जुळ्या बहिणी

लुपिता आणि कारमेन कमरेच्या खाली जोडल्या गेल्या आहेत. त्यांच्या शरीरात एकच प्रजनन यंत्रणा आहे. म्हणजे कोणीही संबंध ठेवले तरी दोघी एकत्रच गरोदर राहतील.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 28 एप्रिल : निसर्गातील प्रत्येक गोष्ट अगदी विचाराने निर्माण केली गेलेली आहे, असं अनेकजण म्हणतात. माणसाला त्याच्या गरजेनुसार पाहण्यासाठी डोळे दिले. धरायला हात, चालायला पाय आणि बोलायला तोंड. पण अनेक वेळा गर्भातच मुलांमध्ये जेनेटिक डिसऑर्डर होतात. त्यामुळे मुलांच्या बनावटीमध्ये काही दोष निर्माण होतात. कधीकधी गर्भाशयात वाढणारी जुळी मुले एकमेकांना चिकटतात. असंच काहीसे दोन बहिणींच्या बाबतीत घडलं, ज्यांच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत.

News18लोकमत
News18लोकमत

22 वर्षांची लुपिता आणि कारमेनचे शरीर कमरेला जोडलं गेलं आहे. यामुळे दोघींनाही आयुष्यात अनेक आव्हानांना सामोरे जावं लागतं. यामध्ये डेटिंग लाईफही आहे. जिथे दोघींपैकी एकीचा बॉयफ्रेंड आहे, तर दुसरी सिंगल आहे. त्यांचे शरीर एकमेकांशी जोडलेलं असल्याने रोमान्स तरी कसा करायचा? असा प्रश्न त्यांना पडतो. आता दोन्ही बहिणींनी सांगितलं की त्यांचं लव्ह लाईफ कसं चालतं. या बहिणींच्या जन्मानंतर डॉक्टरांनी त्या फक्त तीन दिवस जगतील, असं सांगितलं होतं. पण त्यांनी आतापर्यंत आयुष्याची 22 वर्षे जगली. लुपिता आणि कारमेन कमरेच्या खाली जोडल्या गेल्या आहेत. त्यांच्या शरीरात एकच रिप्रोडक्टिव्ह सिस्टिम आहे. म्हणजे कोणीही संबंध ठेवले तरी दोघी एकत्रच गरोदर राहतील. याशिवाय त्यांच्या शरीरातील रक्तप्रवाहही तसाच आहे. त्यांच्या जगण्याची फारशी आशा नव्हती. जन्मानंतर डॉक्टरांनी त्या फक्त तीन दिवस जगतील असं सांगितलं. पण प्रत्येक अडचणीवर मात करून त्यांनी आयुष्याची बावीस वर्षे पाहिली. आता त्यांनी आपल्या लव्ह लाईफबाबतची माहिती लोकांसोबत शेअर केली आहे. दोघींपैकी एका बहिणीचा प्रियकर आहे तर दुसरी सिंगल आहे. बायको हवी पण मेहुणा नको! लग्नासाठी भाऊ नसलेली वधू शोधत आहेत तरुण, कारण… लुपिता आणि कारमेन यांच्यात कारमेनला एक बॉयफ्रेंड आहे. एका डेटिंग अॅपच्या माध्यमातून तिची डॅनियलशी भेट झाली. मूळच्या मेक्सिकोच्या या बहिणी आता अमेरिकेत राहतात. त्यांनी सांगितलं की, डेट करण्यापूर्वी दोघींमध्ये याविषयी खूप सखोल संवाद झाला होता. त्यांनी प्रत्येक पैलूंवर चर्चा केली. यामुळे कारमेन आणि डॅनियल कधीच संबंध ठेवू शकले नाही. दोघंही फक्त क्लोज रिलेशनशिपमध्ये आहेत आणि आपल्या नात्यावर लक्ष केंद्रित करतात. कारमेनने सांगितलं की, लुपिता लवकर झोपते. अशा परिस्थितीत जेव्हा ती झोपी जाते तेव्हा कारमेन आणि डॅनियल खूप बोलतात. जेव्हा डेटिंगचा प्रश्न येतो, तेव्हा कारमेन लुपिताला तारीख निवडण्याची संधी देते, जेणेकरून तिला कंटाळा येऊ नये. अशा प्रकारे तडजोड करून दोन्ही बहिणी डेट एन्जॉय करतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात