पॅरिस, 09 डिसेंबर : सुरक्षित शारीरिक संबंधांच्या मार्गांपैकी एक मार्ग म्हणजे कंडोम. ज्यामुळे लैंगिक आजार आणि नको असलेली गर्भधारणा टाळता येते. बरेच कपल शारीरिक संबंध ठेवताना सुरक्षित आणि सोपा मार्ग म्हणून कंडोमचा वापर करतात. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल आता सरकारच तरुणांना मोफत कंडोम देत आहे. 18 ते 25 वयोगटातील तरुणांना मोफत कंडोम देण्याची घोषणा सरकारने केली आहे. पण हे भारतात नव्हे तर फ्रान्समध्ये घडतं आहे. तिथले राष्ट्रपती एमॅनुअल मॅक्रो यांनी ही घोषणा केली आहे. नको असलेली प्रेग्न्सी रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. गर्भनिरोधनासाठी ही छोटीशी क्रांती असल्याचं ते म्हणाले. फार्मान्सीमध्ये तरुणांना मोफत कंडोम उपलब्ध करून दिलं जाईल असं ते म्हणाले. हे वाचा - पॉर्न स्टार मार्टिनी का होतेय गुगलवर इतकी सर्च; 2022 च्या आहे टॉप 10 लिस्टमध्ये याच वर्षात सरकारने 25 पेक्षा कमी वयाच्या सर्व महिलांना मोफत बर्थ कंट्रोल देण्याचीही घोषणा केली होती. त्यानंतर आता पुरुषांच्या दृष्टीनेही तसाच निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय आरोग्य प्रणालीमार्फत कंडोमचे पैसे दिले जातात.
एका रिपोर्टनुसार फ्रान्समध्ये 96 टक्के हायस्कूलमध्ये कंडोम वेंडिंग मशीन आहे. सुरक्षित शारीरिक ंसंबधांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि कमी वयात होणाऱ्या गर्भधारणेचा धोका कमी करण्यासाठी शाळेत अशा वेंडिंग मशीन लावण्यात आला. 2019 साली इथल्या एका परिसरात सर्वाधिक दोन कोटीपेक्षा जास्त कंडोम विकले गेले होते.