मराठी बातम्या /बातम्या /Viral /

कुटुंबाचं सुरू होतं एकत्र जेवण, अचानक कोसळला सिलिंग फॅन, पाहा भयानक VIDEO

कुटुंबाचं सुरू होतं एकत्र जेवण, अचानक कोसळला सिलिंग फॅन, पाहा भयानक VIDEO

एक कुटुंब (Family) रोजच्यासारखं सगळी जमवाजमव करून जेवायला (dinner) बसलं असताना अचानक सिलिंग फॅन (ceiling fan collapsed) कोसळल्याची घटना घडली आहे.

एक कुटुंब (Family) रोजच्यासारखं सगळी जमवाजमव करून जेवायला (dinner) बसलं असताना अचानक सिलिंग फॅन (ceiling fan collapsed) कोसळल्याची घटना घडली आहे.

एक कुटुंब (Family) रोजच्यासारखं सगळी जमवाजमव करून जेवायला (dinner) बसलं असताना अचानक सिलिंग फॅन (ceiling fan collapsed) कोसळल्याची घटना घडली आहे.

  • Published by:  desk news

मुंबई, 25 ऑगस्ट : कुटुंबातील सगळ्या सदस्यांनी एकत्र जेवण (family dinner) करणं, हा एक अनोखा आनंद असतो. धावपळीच्या वेळी हे शक्य होत नसलं, तरी अनेक कुटुंबं (families) आपल्या कामाचं अशा प्रकारे नियोजन करतात की सर्वांना एकत्र, एका वेळी जेवण करता येईल. कुटुंबातील सदस्य जेवण्याच्या जागी एकत्र यायला सुरुवात होते आणि सगळे येईपर्यंत वाट पाहिली जाते. " isDesktop="true" id="596938" >

एक कुटुंब (Family) रोजच्यासारखं सगळी जमवाजमव करून जेवायला (dinner) बसलं असताना अचानक सिलिंग फॅन (ceiling fan collapsed) कोसळल्याची घटना व्हिएतनाममध्ये (Vietnam) घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या यूट्यूबवर (Viral on YouTube) व्हायरल होत आहे. या कुटुंबातील सगळे सदस्य जमिनीवर मांडी घालून जेवायला बसले होते. यात एक लहान मुलगादेखील होता. सगळे जेवत असताना अचानक पंखा कोसळला आणि सर्वांनाच धक्का बसला.

थोडक्यात बचावले कुटुंबीय

घरातील सर्वजण गप्पा मारत जेवण करत होते. अचानक पंख्याचा आवाज झाल्यामुळे छोट्या मुलाचं लक्ष सर्वप्रथम छताकडे गेल्याचं व्हिडिओत दिसतं. त्यानंतर जोरदार आवाज करत पंख्याचं पातं कुटुंबाच्या मधोमध येऊन पडलं. क्षणार्धात आणि प्रचंड वेगाने हे पातं कुटुंबातील पुरुषाच्या पायापाशी येऊन पडल्याने सगळेच स्तब्ध झाले. हे पातं पडण्याचा वेग इतका होता, की काही नेमकं काय घडलं, हे समजायला काही क्षण गेले. त्यानंतर छोटा मुलगा रडू लागला. त्याची आई धावत त्याच्यापाशी गेली आणि तिने त्याला कुशीत घेऊन त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.

हे वाचा -मोठी बातमी : राज्यातील काँग्रेसचा अंतर्गत वाद दिल्ली दरबारी

अचानक घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ कॅमेरात कैद झाला असून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हे पातं कुणालाही न लागता सर्वांच्या मधोमध येऊन पडल्यामुळे कुणालाही यात इजा झाली नाही. मात्र थोडं जरी पातं इकडेतिकडे पडलं असतं किंवा कुटुंबातील सदस्य बसण्याच्या जागा काही इंचांनी जरी बदलल्या असत्या, तरी गंभीर अपघात होण्याची शक्यता होती. दैव बलवत्तर म्हणूनच हे कुटूंब बचावल्याची भावना नेटिझन्स व्यक्त करत आहेत.

First published:

Tags: Shocking video viral, Video Viral On Social Media