नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर : दिल्लीतील घिटोरनी मेट्रो स्टेशनवर सीआयएसएफच्या एका जवानाने आपली तत्परता दाखवित एका प्रवाशाचा जीव वाचवला. या जवानाने दिल्ली मेट्रोने प्रवास करणारा यात्री ए. एम. शेख (32) याला सीपीआर देऊन त्याचा जीव वाचवला. 11 ऑक्टोबरच्या सायंकाळी दिल्लीच्या घिटोरनी मेट्रो स्टेशनमध्ये अचानक छातीत कळ आल्याने प्रवासी हातपाय मारत खाली कोसळला. त्यादरम्यान सुरक्षेसाठी तैनात काॅन्स्टेबल मनोज त्याच्या दिशेने धावत गेला.
त्यांनी तातडीने प्रवाशाला सीपीआर देण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही वेळात बेशुद्ध झालेला प्रवासी शुद्धीवर आला. त्यानंतर प्रवाशाने रुग्णालयात जाण्याची गरज वाटत नसल्याचे सांगितले. यावेळी प्रवाशाने मनोजला धन्यवाद दिले. सीपीआर देण्याची पूर्ण घटना तेथे लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
या जवानाने प्रसंगावधान राखत प्रवाशीचा जीव वाचवला. त्याचे सर्वांकडून कौतुक केलं जात आहे.
CISF च्या जवानाने तत्परता दाखवित वाचवले प्रवाशाचे प्राण; CCTV मध्ये कैद झाला संपूर्ण घटनाक्रम pic.twitter.com/DbW2HWvQq5
— News18Lokmat (@News18lokmat) October 12, 2020
हे ही वाचा-मुंबई अंधारात: बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे संकेत
सीपीआर म्हणजे काय
ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर वैद्यकीय उपचार सुरू करण्यापूर्वी रुग्णावर प्राथमिक उपचार केले जातात. त्याला सीपीआर म्हणतात.
1 सुरुवातीला संबंधित व्यक्तीला खाद्यांवर थाप मारुन उठविण्याचा प्रयत्न करा. श्वासोच्छवास तपासून पाहा. प्रतिसाद मिळत नसल्यास 108 क्रमांकावर फोन करायला सांगा.
2 छातीच्या हाडावर दोन्ही हातांनी दाब द्यायला सुरुवात करा. मिनिटाला 100 ते 120 या दराने चेस्ट कॉम्प्रेशन द्या. दाब देताना छाती किमान पात ते सहा सेंटिमीटर दाबली जाईल हे पाहा. यामध्ये खंड पडू देऊ नका.
3 रुग्णाने पायात शूट घातले असल्यास ते काढा व घट्ट कपडे असल्यास ते सैल करा.