Home /News /mumbai /

मुंबई अंधारात: बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे संकेत

मुंबई अंधारात: बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे संकेत

मुख्यमंत्र्यांनी उर्जा विभागाचं टेक्निकल ऑडिट करण्याचेही आदेश आजच्या बैठकीत दिले आहेत. असा प्रकार पुन्हा घडू नये याचीही काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी दिलेत.

मुंबई 12 ऑक्टोबर: मुंबई आणि परिसरात सोमवारी अचानक वीज पुरवढा खंडीत झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर अडीच ते तीन तासांनी वीज पुरवढा सुरळीत व्हायला सुरुवात झाली. राज्यात कोरोनाचं संकट असल्याने हॉस्पिटल्समधल्या वीज पुरवढ्याबाबत प्रशासन चिंतेत होतं. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित सर्व विभागांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिलेत. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश या आधीच मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी उर्जा विभागाचं टेक्निकल ऑडिट करण्याचेही आदेश आजच्या बैठकीत दिले आहेत. वीज पुरवठा खंडीत झाल्या प्रकरणी काही बेजबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई होऊ शकते. वीज पुरवठा खंडीत झालेल्या तीनही वाहिन्या तात्काळ पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. असा प्रकार पुन्हा घडू नये याचीही काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी दिलेत. दरम्यान,  दुरूस्तीचं काम सुरू असतानाही पर्यायी व्यवस्था न करता आणि पुरेसा अंदाज न घेता काम केल्याचं स्पष्ट होत आहे. अशा घटना या परवडणाऱ्या नसल्याने प्रशासनही खडबडून जागं झालं आहे. भाजपनेच मेट्रोचा ‘इगो’ केला, राष्ट्रवादीचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार कळवा तळेगाव पॉवर ग्रीड लाईन 10 तारखेपासूनच अंडर ब्रेक डाऊन झाली होती. अशातच पहाटे साडेचार वाजता कळवा पडघा ही लाईनही ट्रीप झाली. त्यामुळे इतर वाहिन्यांवर प्रचंड ताण आला. या तांत्रिक बिघाडाची दुरूस्ती सुरू असताना पर्यायी व्यवस्था का निर्माण केली गेली नाही हा मुख्य प्रश्न असून त्याचं उत्तर दिल्या गेलेलं नाही. सकाळी नेमकं काय झालं? 10 ऑक्टोबर पासूनच कळवा-तळेगाव पॉवर ग्रीड ही ब्रेकडाउन होती. सोमवार सकाळी 4.33 वाजता कळवा पडघा ही लाईन ट्रिप झाली. त्यानंतर कळवा पडघा ही लाईन 10.1 वाजता कोलमडून गेली. तळेगाव-खारघर ही लाईन 0.02 वाजता ट्रिप झाली. तर पालघर ग्रीडच्या 3 लाईन्स 10.5 वाजता ट्रिप झाल्यात. तळेगाव--खारघर या ग्रीड मध्ये तर शॉर्ट सर्किट सारख्या ठिणग्या उडत होत्या. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे मुंबईत बत्ती गुल झाली.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Uddhav thackeray

पुढील बातम्या