मुंबई, 03 ऑगस्ट : कारमुळे अनेकांचा जीव गेल्याचं तुम्हाला माहिती असेल पण कोणत्या कारने कुणाचा जीव वाचवल्याचं कधी ऐकलं आहे का? कार तर निर्जीव आहे मग ती कुणाचा जीव कशी काय वाचवू शकते, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण एका निर्जीव कारने एका मुलाचा जीव वाचवला आहे. एका चवताळलेल्या रेड्याने एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केला. त्यावेळी कारमुळे या मुलाचा जीव वाचला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका व्यक्तीवर घराजवळच संतप्त रेड्याने खतरनाक हल्ला केला. व्हिडीओत पाहू शकता रेडा इतका संतप्त झाला आहे की तो मुलाला आपल्या शिंगांवर घेतो आणि हवेत उडवतो, त्यानंतर त्याला जमिनीवर आपटतो. मुलाची तो इतकी भयंकर अवस्था करतो की आता त्याचा जीव जातो की काय अशीच भीती वाटू लागते. पण या मुलाचं नशीब बलवत्तर म्हणून सुदैवाने जवळच एक पार्क केलेली कार या त्याचा जीव वाचवते. हे वाचा -
मगरीने पिल्लाला जबड्यात धरलं, वाचवण्यासाठी आईने पायाखाली तुडवून मारलं; पाहा VIDEO रेडा जेव्हा या मुलाला उडवतो तेव्हा मुलगा त्या कारच्या खाली जातो. रेडा तिथंही त्याच्यावर हल्ला करायला जातो. पण मुलगा कारखाली आत असल्याने तो रेड्याच्या तावडीत सापडत नाही. इथपर्यंत रेडा आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही हे समजताच तो मुलगा आणखी खाली जाते. कारखाली जाता येणं शक्य नसल्याचं समजताच रेडाही थोडा वेळ वाट पाहतो आणि तिथून निघून जातो. तेव्हा तो मुलगा कारखालून बाहेर येतो. रस्त्यावर पडलेल्या आपल्या वस्तू उचलतो आणि तिथून पळ काढतो.
मुलाला गंभीर दुखापत झाली आहे हे त्याच्या हालचालीवरून दिसून येतो. पण सुदैवाने कारमुळे त्याचा जीव वाचतो. जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे दृश्य कैद झालं. ‘मन्नालाल डोबवाल हमीरपुरा’ फेसबुक अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







