व्हिडीओत पाहू शकता एका छताचं काम सुरू आहे. छतावर नारळाच्या झावळ्यांसारखं काहीतरी टाकलं जात आहे. हे वाचा - पर्यटकांसह आकाशात झेपावताच क्रॅश झाला Hot Air Balloon; भयंकर दुर्घटनेचा VIDEO हा चिमुकला याच झावळ्या आपल्या पाठीला लावतो. दोन्ही हातांवर त्या पंखाप्रमाणे धरतो. तो अगदी घार, गरूड अशा विशाल पक्ष्यांप्रमाणेच दिसतो आहे. यानंतर तो चिमुकला छताला घसरगुंडीप्रमाणे लावलेल्या एका लाकडी पट्टीवर येतो आणि आपले झावळ्यांचे पंख उडवत तो त्या पट्टीवरून उडी मारतो आणि आकाशात पक्ष्यासारखी झेप घ्यायला पाहतो. साहजिकच हे खरे पंख नाहीत त्यामुळे चिमुकला पक्ष्यासारखं उंच झेप नाही. पण किमान काही अंतर तो उडतो आणि मग खाली पडतो. काही क्षण का होईना पंख लावून तो पक्ष्यासारखं उडण्याचा आनंद अनुभवतो. हे वाचा - OMG! चक्क डोक्यावर ठेवली 735 अंडी; VIDEO पाहून तोंडात घालाल बोटं आयएएस अधिकारी अश्विन शरन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ही आशा आहे ज्यामुळे तुम्ही उडता असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. त्यांनी पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ अरुणाचल प्रदेशमधील एका ठिकाणावरील आहे.It’s the ‘HOPE’ that makes you fly.
Somewhere in Arunachal Pradesh. ❤️ pic.twitter.com/IJAI077UZV — Awanish Sharan (@AwanishSharan) October 11, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral, Viral videos