जाहिरात
मराठी बातम्या / Viral / अरेच्चा! हे काय? तरुणीसोबत चक्क 3 मांजरीनं खेळलं बॅडमिंटन, खेळण्याची पद्धत पाहून अवाक व्हाल, VIDEO

अरेच्चा! हे काय? तरुणीसोबत चक्क 3 मांजरीनं खेळलं बॅडमिंटन, खेळण्याची पद्धत पाहून अवाक व्हाल, VIDEO

अरेच्चा! हे काय? तरुणीसोबत चक्क 3 मांजरीनं खेळलं बॅडमिंटन, खेळण्याची पद्धत पाहून अवाक व्हाल, VIDEO

सध्या सोशल मीडियावर तीन मांजरींचा एक अतिशय मनोरंजक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्या एका व्यक्तीसोबत बॅडमिंटन खेळताना दिसत आहेत

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 16 एप्रिल : खेळांमध्ये बॅडमिंटन हा बहुतेक लोकांचा आवडता खेळ आहे, ज्याचे चाहते जगभरात आहेत. तुम्ही बॅडमिंटनचे अनेक सामने पाहिले असतील, पण तुम्ही कधी एखाद्या प्राण्याला बॅडमिंटन खेळताना पाहिलं आहे का? नाही, मग बघा… या व्हिडिओमध्ये तुम्ही तीन मांजरी हा गेम खेळताना पाहू शकता आणि तुम्हाला हा व्हिडिओ अनेक वेळा लूपमध्ये पाहायला आवडेल.

News18लोकमत
News18लोकमत

सध्या सोशल मीडियावर तीन मांजरींचा एक अतिशय मनोरंजक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्या एका व्यक्तीसोबत बॅडमिंटन खेळताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की एका मुलीच्या हातात बॅडमिंटनचं रॅकेट आहे, ती एका हॉलमध्ये आहे आणि तिच्यासोबत तीन मांजरीही तिथे उभ्या आहेत. मांजरांपैकी एक कचरा पेटीच्या वर बसली आहे आणि तिची मालकिन शटलला हिट करताच ते दुसर्‍या मांजरीकडे पोहोचतं, ही मांजर हे शटल आपल्या पंजाने मारते.

जाहिरात

अगदी असंच इतर दोन मांजरही करतात, जेव्हा हे शटल त्यांच्याकडे जातं. या मांजरी हे शटल तरुणीकडे हिट करतात. व्हायरल होणारा हा व्हिडिओ नेटकऱ्यांना आश्चर्यचकित करत आहे. कारण आजपर्यंत तुम्ही बॅडमिंटनचे अनेक सामने पाहिले असतील. मात्र, हा सर्वात अनोखा आणि मन जिंकणारा सामना आहे. मांजरींना माणसासोबत बॅडमिंटन खेळताना पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. ही छोटीशी क्लिक इन्स्टाग्रामवर @lian.shorts नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केली गेली आहे. या व्हिडिओला यूजर्सची मोठी पसंती मिळत आहे. अनेकजण हा व्हिडिओ शेअरही करत आहेत. 25 मार्च रोजी शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 59 लाखहून अधिकांनी लाईक केला आहे. हा आकडा झपाट्याने वाढत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात