जाहिरात
मराठी बातम्या / Viral / ट्रकमधून नोटा पडल्यानं रस्त्यावरच 'पैशाचा पाऊस'; लोकांनी अक्षरशः पिशव्या भरून लुटले पैसे, VIDEO

ट्रकमधून नोटा पडल्यानं रस्त्यावरच 'पैशाचा पाऊस'; लोकांनी अक्षरशः पिशव्या भरून लुटले पैसे, VIDEO

ट्रकमधून नोटा पडल्यानं रस्त्यावरच 'पैशाचा पाऊस'; लोकांनी अक्षरशः पिशव्या भरून लुटले पैसे, VIDEO

महामार्गावर भरपूर रोख नोटा होत्या. लोकांनी वाहने थांबवली आणि महामार्ग पूर्णपणे रोखून बॅगमध्ये नोटा भरण्यास सुरुवात केली

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 21 नोव्हेंबर : US च्या कॅलिफोर्नियामधील एक व्यस्त महामार्ग या कारणामुळे चर्चेत आला आहे कारण याठिकाणी अचानक पैशाचा पाऊस पडू लागला (Cash rain on to US Freeway). बख्तरबंद ट्रकमधून या नोटा रस्त्यावर पडल्या. एका व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) पाहायला मिळतं की कशाप्रकारे लोक आपल्या गाड्यांमधून उतरून रस्त्यावरून नोटा जमा करत आहेत. कॅलिफोर्निया हायवे पेट्रोलच्या (California Highway Patrol) प्रवक्त्याने सीएनएनला सांगितले की, “महामार्गावर भरपूर रोख नोटा होत्या. लोकांनी वाहने थांबवली आणि महामार्ग पूर्णपणे रोखून बॅगमध्ये नोटा भरण्यास सुरुवात केली.” महामार्गाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी दोन लोकांना त्यांच्या कारमध्ये बंद करून लेन्स अडवल्याबद्दल हातकड्याही घालण्यात आल्या होत्या.

जाहिरात

सीएचपीच्या प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार, “आम्ही आता एफबीआयसोबत काम करत आहोत, ही एक संयुक्त तपासणी आहे. ज्या कोणी इथून नोटा रक्कम उचलल्या असतील त्यांना मी शिफारस करतो की तुम्ही त्या ताबडतोब सीएचपी कार्यालयात परत करा. कारण आमच्याकडे कारवाई करण्यासाठी भरपूर पुरावे आहेत. यातील काही व्हिडिओंचे स्क्रीनशॉट शुक्रवारी उशिरा सीएचपीने जारी केले. ते एफबीआयसह घटनेची चौकशी करत होते. एजन्सीने सांगितले की ते फोटोंमधील वाहनचालकांची ओळख निश्चित करण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि त्यांना संभाव्य गुन्हेगारीचा आरोप टाळण्यासाठी 48 तासांच्या आत पैसे परत करण्याचे आवाहन केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात