जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Video Viral : कारला भरधाव ट्रकने दिली धडक, अंगावर काटा आणणारा अपघात

Video Viral : कारला भरधाव ट्रकने दिली धडक, अंगावर काटा आणणारा अपघात

कारला भरधाव ट्रकने दिली धडक

कारला भरधाव ट्रकने दिली धडक

अपघात होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. वाढणाऱ्या अपघातांमुळे सरकारकडून नियम बाळगण्याचं आणि हेल्मेट घालण्याचं आवाहन वारंवार केलं जातं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 17 जुलै : अपघात होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. वाढणाऱ्या अपघातांमुळे सरकारकडून नियम बाळगण्याचं आणि हेल्मेट घालण्याचं आवाहन वारंवार केलं जातं. रस्त्यावर चालताना किंवा गाडी चालवताना कायम सतर्क आणि सावधान राहा असं सांगितलं जातं. तरीही लोकांचे अपघात होतात. अनेक भीषण अपघाताच्या घटना आत्तापर्यंत समोर आल्या आहेत. असाच एक अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा अपघात हृदयाचा ठोका चुकवणारा आहे. घाईमुळे मोठा भीषण अपघात झाला. याचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. गाडीचा चालक इतका घाईत होता की त्याला बाजूने येणारा भरधाव ट्रकही दिसला नाही.

News18लोकमत
News18लोकमत

समोर आलेल्या अपघाताच्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक कार चालक रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला एवढी घाई होती की त्याला बाजूने येणारा भरधाव ट्रकही दिसला नाही. अचानक समोर आलेल्या कारमुळे ट्रकचा तोल बिघडला आणि तो पलटी झाला. ट्रक कारवर पडताच कारचा चुराडा झाल्याचं दिसतंय. धोकादायक अपघाताचा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्याही अंगावर काटा येईल.

जाहिरात

@funfactory1194 नावाच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर अनेक कमेंटही येताना दिसत आहे. हा भीषण अपघाताच व्हिडीओ पाहून अनेकांना धडकी भरली असून नेटकरी रस्त्यावर गाडी चालवताना लक्ष योग्य जागी देण्यास सांगत आहेत. हा अपघात नेमका कुठे झाला याविषयी स्पष्टता नाही. मात्र व्हिडीओ इंटनेटवर धुमाकूळ घालत आहे. दरम्यान, यापूर्वीही अशा भयानक अपघातांचे व्हिडीओ समोर आले आहेत. अशा अपघातांमध्ये अनेकांचा जीव जातो तर काहीजण गंभीर जखमी होतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात