मराठी बातम्या /बातम्या /Viral /

कार चोरण्यासाठी आलेल्या चोरट्यांची उडाली तारांबळ, पेट्रोलनं अभिषेक; व्हिडिओ VIRAL

कार चोरण्यासाठी आलेल्या चोरट्यांची उडाली तारांबळ, पेट्रोलनं अभिषेक; व्हिडिओ VIRAL

आपल्या वस्तू चोरांपासून वाचवण्यासाठी नेहमी सावध राहून काळजी घ्यावी लागते. मात्र, कधी कधी चोरांचा अनोखा अंदाज चकित करून जातो तर, कधी चोरट्यांना पळवून लावणाऱ्याची कमाल.. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल (Video Viral) होत आहे.

  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली - आपल्याला साध्या-साध्या वस्तूंपासून ते महागड्या वस्तूंपर्यंत सर्व काही चोरांपासून वाचवण्यासाठी नेहमी सावध राहून काळजी घ्यावी लागते. मात्र कधी कधी चोरांचा (Thieves) अनोखा अंदाज चकित करून जातो तर, कधी चोरट्यांना पळवून लावणाऱ्याची कमाल.. असाच एक व्हिडिओ रेक्स चॅपमन यांनी ट्विटरवरून शेअर केला आहे. कार चोरी (Car Thieves) करणाऱ्या चोरांची कशी भंबेरी उडवून द्यावी, ते या व्हिडिओत पाहावे, असे त्यांनी लिहिले आहे. या व्हिडिओमध्ये एक कार पेट्रोल पंपावर थांबलेली दिसत आहे. या कारमध्ये पेट्रोल भरले जात असतानाच दुसऱ्या बाजूने आणखी एक मोठी व्हॅन येते. यातून तिघे-चौघे उतरतात आणि वेगवेगळ्या बाजूंनी पेट्रोल भरणाऱ्याच्या दिशेने जातात. मात्र, तो सावध असल्यामुळे काहीतरी चुकीच्या इराद्याने ही मंडळी हालचाली करत असल्याचे त्याच्या लक्षात येते. त्याबरोबर तो हातातल्या पेट्रोलच्या पाइपने या सर्वांना थेट पेट्रोलचीच आंघोळच घालतो..! यामुळे गडबडून गेलेले हे सर्व चोर पळून जातात.. या व्हिडिओला आत्तापर्यंत 37 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहून लोकांची हसता हसता पुरेवाट झाली आहे. पेट्रोल भरणाऱ्या व्यक्तीची समयसूचकता आणि त्याने तातडीने केलेल्या कृतीचे लोकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. हे वाचा - कोरोनाची लक्षणं आहेत मात्र चाचणी निगेटिव्ह! जाणून घ्या या परिस्थितीत कशी घ्यावी स्वतःची काळजी दरम्यान, ही घटना कुठली आहे, हे अद्याप समजलेले नाही. मात्र, पेट्रोल भरणाऱ्याची शक्कल जबरदस्त आहे, यात शंका नाही. या प्रकारे आपणही नेहमी चोरांपासून सजग राहिले पाहिजे. आपण घरी असू, कुठे कामानिमित्त जात असू किंवा कोठे फिरण्यासाठी जात असतो, अशावेळी आपले आजूबाजुला नेहमी बारकाईने लक्ष असले पाहिजे. आपल्या आजूबाजूला कोण लोक आहेत. ते काय करत आहेत, त्यांच्या हरकतींवर आपले बारीक लक्ष असायला हवे. व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे पेट्रोल भरणारी व्यक्ती फार सजग आहे. क्षणार्धात घडलेल्या प्रकारातही त्याने तीन चोरट्यांना पळवून लावले.
First published:

Tags: Car, Thieves, Videos viral

पुढील बातम्या