लखनऊ, 30 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशातील नोएडामधून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथे एका व्यक्तीने कारची चोरी करीत OLX वर 12 वेळा विकली आहे. फसवणूक समोर आल्यानंतर पोलिसांनी मनोत्तम त्यागी उर्फ मनु त्यागी नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. नोएडाचे एडीसीपी रणविजय सिंह यांनी सांगितले की, आरोपी हा अमरोहा येथील राहणारा आहे. त्याच्याजवळ बनावटी नंबर, दोन मोबाइल, खोटे पॅनकार्ड, आधार कार्ड आणि 10 हजार रुपये कॅश सापडली आहे.
आरोपी कार विकण्यासाठी OLX वर जाहिरात करीत होता. त्यानंतर तो तिच कार वारंवार विकत होता. त्याने कारचे बनावटी चावी तयार केली होती व ती स्वत:जवळ ठेवत होता. त्याशिवाय या चोराने कारमध्ये जीपीएस लावला होता. कार विकल्यानंतर तो जीपीएस आणि डुप्लीकेट चावीने कार चोरी करीत होता. त्यानंतर तो पुन्हा ओएलएक्सवर जाहिरात शेअर करायचा. अशा प्रकारे त्याने एकच कार 12 वेळा विकली आणि चोरली आहे.
हे ही वाचा-अमेरिकन सिनेटरना घेता येईना Google च्या CEO चं नाव; पिचाई चा उच्चार काय केला...
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी ऑगस्ट महिन्यात जामीनावर उत्तराखंड जेलमधून बाहेर आला होता. तेथेदेखील फसवणुकीच्या आरोपाखाली त्याला तुरुंगात टाकण्यात आले होते. त्याच्याविरोधात उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये अनेक केसेस सुरू आहेत. सेक्टर-39 भागात हत्या आणि दरोडा घालण्याचा आरोप आहे. एका व्यक्तीने याबाबत गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणात मनु त्यागी याच्या फसवणुकीचा खुलासा झाला.
त्यांनी पोलिसांना सांगितले की, 2 महिन्यांपूर्वी आरोपी मनुने 2.70 लाख रुपयांची एक स्विफ्ट गाडी विकली होती. मात्र कार त्यांच्या नावावर ट्रान्सफर झाली नव्हती. यादरम्यान त्याने ही कार विकण्यासाठी ओएलएक्सवर जाहिरात टाकली. फसवणुकीच्या संशयाने त्यांनी हा प्रकार पोलिसांना सांगितला. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.