Home /News /viral /

केमोथेरपी सुरु असताना थेट रुग्णालयातून दिला जॉब Interview, फोटो व्हायरल होताच नेटिझन्सनी केलं फायटिंग स्पिरिटचं कौतुक

केमोथेरपी सुरु असताना थेट रुग्णालयातून दिला जॉब Interview, फोटो व्हायरल होताच नेटिझन्सनी केलं फायटिंग स्पिरिटचं कौतुक

या फोटोमध्ये एक व्यक्ती हॉस्पिटलच्या बेडवर बसून जॉब इंटरव्ह्यू (Job interview) देताना दिसत आहे. हा फोटो खरं तर अर्श नंदन प्रसाद (Arsh Nandan Prasad) या व्यक्तीचा आहे.

नवी दिल्ली, 28 एप्रिल: आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आपण कोणत्याही अडचणीवर मात करू शकतो. याच गोष्टीचा प्रत्यय देणारा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या फोटोमध्ये एक व्यक्ती हॉस्पिटलच्या बेडवर बसून जॉब इंटरव्ह्यू (Job interview) देताना दिसत आहे. हा फोटो खरं तर अर्श नंदन प्रसाद (Arsh Nandan Prasad) या व्यक्तीचा आहे. अर्श यांनी आपला कॅन्सरशी लढा सुरू असताना नोकरीसाठी मुलाखत (Interview during Chemotherapy) दिली होती. त्यांचा हा फोटो हजारो नेटिझन्ससाठी प्रेरणादायी ठरत आहे. सहानुभूती नको, मी समर्थ अर्श यांनी लिंक्डइन या सोशल नेटवर्किंग साईटवर आपला फोटो (Chemotherapy interview viral picture) शेअर केला होता. “जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये तुमचा बेस्ट परफॉर्मन्स देता, मात्र केवळ आयुष्यातील एका पॅचमधून जात असल्यामुळे तुमचं सिलेक्शन होत नाही. या कंपन्या किती उदार आहेत, हेच यातून दिसून येतं.” अशा आशयाच्या कॅप्शनसह अर्श यांनी आपला फोटो पोस्ट केला होता. अर्श म्हणतात, की मुलाखत घेणाऱ्यांना माझ्या कॅन्सरबद्दल समजताच त्यांचे भाव बदलतात. मला तुमच्या सहानुभूतीची गरज नाही. मी इथे स्वतःला सिद्ध करण्यासाठी आलो आहे. महाराष्ट्रातील कंपनीने दिली ऑफर अर्श यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल (Arsh Prasad viral photo) झाल्यानंतर महाराष्ट्रातील एका टेक कंपनीने त्यांना जॉब ऑफर दिली आहे. अप्लाइड क्लाउड कम्प्युटिंग या कंपनीचे सीईओ नीलेश सातपुते (Nilesh Satpute) यांनी अर्श यांना ही ऑफर दिली. “अर्श, तुम्ही एक योद्धा आहात. कृपया उपचारांदरम्यान मुलाखती देणं टाळा. मी तुमची डॉक्युमेंट्स पाहिली आहेत, ती स्ट्राँग आहेत. तुम्ही जेव्हा शक्य होईल तेव्हा आम्हच्या कंपनीला जॉईन करू शकता. तुम्हाला मुलाखतदेखील देण्याची गरज नाही.” असं सातपुते यांनी म्हटलं आहे. नेटिझन्सनी केलं फायटिंग स्पिरिटचं कौतुक अर्शच्या पोस्टला (Cancer patient job interview) तब्बल 94 हजारांहून अधिक लाईक्स आणि साडेतीन हजारांहून अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत. अर्शचं धाडस आणि जिद्द यामुळे कित्येक नेटिझन्स प्रेरित होत आहेत. कमेंट्समध्येदेखील नेटिझन्स अर्श यांच्या फायटिंग स्पिरिटचं कौतुक करत आहेत. तसंच, कित्येक जण त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थनाही करत आहेत. “यालाच म्हणतात फायटिंग स्पिरिट. तुम्हाला सलाम.”, “तुम्ही लवकरात लवकर बरे व्हाल यासाठी मी प्रार्थना करत आहे. तुमच्या या तपाचे मी खरोखरच कौतुक करतो,” अशा काही कमेंट्स अर्श यांच्या पोस्टवर पहायला मिळाल्या.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Photo video viral, Photo viral, PHOTOS VIRAL

पुढील बातम्या