मुंबई 11 डिसेंबर : काही वेळा छायाचित्रांमध्ये असं काही ऑप्टिकल इल्युजन असतं, जे मेंदूला आणि डोळ्यांना गोंधळात टाकतं. अनेकदा या छायाचित्रांमधली अशी काही गोष्ट शोधण्याचं आव्हान दिलं जातं, ज्यामुळे मेंदू अगदी थकून जातो. अशी आव्हानं मेंदू आणि डोळ्यांसाठी खूप चालना देणारी ठरतात. अशा गोष्टी शोधण्यासाठी विशेष कष्ट घ्यावे लागतात. सध्या असाच एक आव्हानात्मक फोटो व्हायरल होत आहे, जो तुमच्या मेंदूचा कस लावणारा ठरेल. अमेरिकी वाइल्डलाइफ फोटोग्राफर आर्ट वोल्फ यांच्या कॅमेऱ्यात असा एक फोटो टिपला गेला आहे. त्यात लांडगा आहे पण तो कोणालाच सहज दिसत नाही. आता तुम्हाला तो प्राणी 11 सेकंदात शोधून ऑप्टिकल इल्युजनचं आव्हान पार करावं लागणार आहे. जंगलात लपलेल्या लांडग्याला शोधणं सोपं नाही ऑप्टिकल इल्युजन चॅलेंज म्हणून शेअर केलेला फोटो हा एका जंगलातला आहे. हा फोटो अमेरिकी वाइल्डलाइफ फोटोग्राफर आर्ट वोल्फ यांनी त्यांच्या कॅमेरातून टिपला आहे. हा फोटो काढत असताना तो डोळ्यांना संभ्रमात टाकेल आणि मेंदूला आव्हान देणारा ठरेल, असं कदाचित त्यांना वाटलं नसेल. अवघ्या 11 सेकंदात तुम्हाला या फोटोतल्या जंगलात असलेला लांडगा शोधायचा आहे. या लांडग्याचा पटकन शोध घेणं सोपं नाही. अशा प्रकारच्या चॅलेंजमुळे केवळ तुमची निरीक्षणक्षमताच वाढत नाही, तर यामुळे मेंदूला कसरतदेखील करावी लागते. सध्या, तुम्ही झाडाच्या खोडाभोवती असलेल्या लांडग्याला शोधून काढण्यावर लक्ष केंद्रित करा. लांडग्याचे डोळे चमकताना दिसतील या ऑप्टिकल इल्युजन टेस्टमध्ये, तुम्हाला जंगलात लपलेला लांडगा 11 सेकंदांत शोधायचा आहे. या फोटोत हा लांडगा असून तो कोणालाही सहजासहजी दिसत नाहीये. परंतु,या फोटोत लांडगा आहे, या म्हणण्यावर विश्वास ठेवा. त्याला शोधण्यासाठी तुम्हाला सूक्ष्म नजर आणि मेंदूचा प्रभावी वापर करावा लागेल. एक हिंट म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो की लांडग्याचा रंग फिकट पांढरा आहे. म्हणजेच तो फोटोत दिसत असलेल्या झाडाच्या खोडासारखाच आहे. फोटोत कॅमेऱ्याच्या अगदी समोर एक झाड दिसत आहे, त्याच्या शेजारी दुसरं झाड आहे. फक्त समोर दिसणाऱ्या झाडाच्या खोडाच्या खालच्या भागावर तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल.
व्हायरल फोटो
तिथे तुम्हाला एखादा प्राणी अस्पष्ट दिसेल. बऱ्याच वेळपासून तुमच्या नजरेला चकवणारा हा प्राणी दुसरा-तिसरा कोणीही नसून लांडगा आहे.
काही हुशार आणि चाणाक्ष व्यक्तींनी त्याला अगदी कमी वेळेत शोधून काढलं असेल.