मुंबई 1 डिसेंबर : ऑप्टिकल इल्युजन्सवर आधारित असलेल्या छायाचित्रांद्वारे दिलेल्या आव्हानामुळे आपला एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन तर बदलतोच, पण त्यासोबत आयक्यूचा स्तरही सुधारतो. चित्रात दडलेली गोष्ट शोधण्यासाठी आपल्या मेंदूला अनेक प्रकारे विचार करावा लागतो. प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीकडे सूक्ष्म नजरेनं पाहावं लागतं. यामुळे आपला मेंदू सक्रिय होतो आणि समजदेखील वाढते.
सध्या एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोतल्या कुत्र्याला शोधून काढणं कदाचित तुम्हाला अवघड ठरू शकतं.
डोळे आणि मेंदूला फसवण्यात सक्षम असलेली अशी चित्रं आणि फोटोज निरीक्षण कौशल्याची चाचणी घेण्यासाठी ओळखले जातात. चित्रात समोर असलेली गोष्ट तुम्हाला दिसत नसेल तर तो फोटो किंवा चित्र एक ऑप्टिकल चॅलेंज देत आहे, असं समजावं.
हे ही पाहा : सोपं वाटत असलं तरी हे सोपं नाहीय, फोटोत लपलेली मांजर १० सेकंदात शोधणं शक्य नाहीय....
अशाच एका फोटोत दडलेला कुत्रा शोधून काढणं काही जणांसाठी कठीण बनलं आहे.
बागेत बसलेला कुत्रा दिसतोय का?
या वेळी आव्हान ठरत असलेला ऑप्टिकल इल्युजन फोटो एका सार्वजनिक उद्यानातला आहे. हा फोटो कॅमेरामनने अगदी नेमक्या वेळी कॅमेऱ्यात टिपला आहे. फोटो क्लिक करण्याची वेळ इतकी परफेक्ट होती की कदाचित नियोजन न करतादेखील हा फोटो ऑप्टिकल इल्युजन चॅलेंज देण्यास पात्र ठरला आहे. या फोटोत चोहीकडे हिरवंगार गवत दिसत आहे.
या गवतात बसण्यासाठी एक बेंच आहे. या गोष्टीशिवाय फोटोत दुसरं काहीच दिसत नाही; पण यात एक कुत्रा आहे, जो शोधून काढणं हेच आव्हान आहे. तो लक्षपूर्वक पाहूनही सापडत नाही.
जर, आपण बु्द्धिमान आणि प्रतिभावंत असल्याचं सिद्ध करायचं असेल तर तुम्हाला या बागेच्या फोटोत लपलेला कुत्रा 11 सेकंदांत शोधून काढावा लागेल. हे आव्हान नक्कीच सोपं नाही. कारण या फोटोत एखादा प्राणी असल्याचं कदाचित कोणालाही दिसलं नसेल. सूक्ष्म नजर आणि बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्ती या कुत्र्याला नक्की शोधून काढू शकतात.
तुम्ही प्रयत्न करून थकला असलात, तर फोटोतल्या बेंचच्या हॅंडलकडे नजर टाका. हॅंडलच्या मधोमध असलेल्या मोठ्या छिद्रातून कुत्रा डोकावताना दिसेल. त्याचं शरीर हॅंडलच्या मागे लपलेलं असलं, तरी छिद्रातून फक्त चेहरा दिसेल अशा प्रकारे हा फोटो सेट केला गेला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dog, Game, Social media, Top trending, Viral, Viral photo