व्हिडीओत पाहू शकता उंटाचा कळप रस्त्यावरून जात आहे. तिथून पुढे जायला जागा नाही. पण मागून येणारा बाईकस्वार ज्याला उंटाच्या पुढे जायची घाई आहे, तो आधी उंटांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतो. पण त्याला काही जागा मिळत नाही. पण तो फुटपाथवरून आपली दुचाकी चालवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा एक उंट त्या व्यक्तीला जोरदार लाथ मारून ढकलून देतो. हे वाचा - इवल्याशा बोक्यानं वाचवला दोन चिमुकल्यांचा जीव, जीवाचं बलिदान देत ठरला हीरो नशीब बलवत्तर म्हणून दुचाकीस्वाराचा थोडक्यात जीव वाचला पण तोल मात्र जाताजात राहिला. या घटनेनंतर दुचाकीस्वार पुरता गांगरून गेला होता. ही घटना सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच मजेशीर प्रतिक्रियादेखील येत आहेत. व्हिडीओ पाहून तसं हसायलादेखील येतं आहे. पण माणूस करत असलेल्या चुकांची जाणीवदेखील या व्हिडीओतून होते. वाहतुकीचे नियम आपल्या सुरक्षेसाठी पाळणं आवश्यक आहे. मात्र बऱ्याचदा ते पाळले जात नाहीत. हा व्हिडीओ पाहून तरी असा चुका करणाऱ्या माणसांनी नक्की धडा घ्यावा.Respect lane driving🙏🏼 pic.twitter.com/u87Rbk4fNE
— Susanta Nanda IFS (@susantananda3) February 18, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Camel kick man, Funny video, Lifestyle, Social media, Sushant nanda, Traffic Rules, Viral, Viral video.