जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Viral News : मोबाईल खरेदी करा आणि 2 किलो टोमॅटो फ्री मिळवा, शोरुमच्या मालकाची भन्नाट ऑफर

Viral News : मोबाईल खरेदी करा आणि 2 किलो टोमॅटो फ्री मिळवा, शोरुमच्या मालकाची भन्नाट ऑफर

मोबाईल खरेदी करा आणि 2 किलो टोमॅटो फ्री मिळवा

मोबाईल खरेदी करा आणि 2 किलो टोमॅटो फ्री मिळवा

सध्या सगळीकडे एकच चर्चा पहायला मिळतेय ती म्हणजे टोमॅटो रेट. टोमॅटोची किंमत सध्या स्पीडमध्ये वाढत असून हा एक लोकांच्या चिंतेचा विषय बनला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 10 जुलै: सध्या सगळीकडे एकच चर्चा पहायला मिळतेय ती म्हणजे टोमॅटो रेट. टोमॅटोची किंमत सध्या स्पीडमध्ये वाढत असून हा एक लोकांच्या चिंतेचा विषय बनला आहे. बऱ्याच ठिकाणी एक किलो टोमॅटो 130 रुपयांनी विकला जातोय तर कुठे 150, 160 रुपयांपर्यंत विकला जात आहे. वाढता टोमॅटोच्या भावामुळे सामान्य नागरिकच नाही तर मोठ मोठ्या रेस्टॉरंट, हॉटेलवरही याचा परिणाम पहायला मिळतोय. सोशल मीडियावर तर मीम्सचा पाऊस सुरु आहे. विक्रेते डोकं लढवून आपल्या वस्तू विकण्यासाठी टोमॅटोच्या महागाईचाही फायदा उचलताना दिसतायेत. नुकत्यात स्मार्ट फोन विक्रेत्याने फोन खरेदीवर टोमॅटो मोफत मिळतील अशी जाहिरात केली. सध्या ही जाहिरात सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. मोबाईल शोरुमच्या दुकानात मोबाईल खरेदीवर टोमॅटो ऑफर देण्यात आली आहे. ही जाहिरात बघता बघता जोरदार व्हायरल झाली आणि चर्चेचा विषय ठरत आहे. ही घटना मध्य प्रदेशमधील आहे. ही ऑफर नेमकी काय आहे आणि त्याचा फायदा कसा करुन घ्यायचा याविषयी जाणून घेऊया.

News18लोकमत
News18लोकमत

मध्य प्रदेशातील अशोक नगर येथील एका मोबाईल शोरुममध्ये ही ऑफर देण्यात आलीय. मोबाईल शोरूम ऑपरेटरने स्मार्टफोन खरेदीवर 2 किलो टोमॅटो मोफत देण्याची घोषणा केली आहे. शहरात टोमॅटोचे भाव 160 रुपयांच्या पुढे गेले असून त्यामुळे लोकांनी मोबाईल खरेदीसाठी शोरूममध्ये गर्दी केली. Viral News: महिलेनं काढले 800 टॅटू, आता कोणतंच काम मिळेना ऑफरविषयी सांगताना मोबाईल शोरुमचे मालक अभिषेक अग्रवाल यांनी सांगितलं की, आजच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोबाईल शोरूममध्ये विविध ऑफर्स दिल्या जातात. अशा स्पर्धेच्या काळात टोमॅटोचे भाव वाढले असून आम्ही दुकानाबाहेर बॅनरही लावले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात