नवी दिल्ली, 10 जुलै : आजकाल नवनवीन फॅशन सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये येत असते. यातील एक गोष्ट म्हणजे टॅटू. आजकाल टॅटू बनवण्याची फॅशनच झालीय. लोक निरनराळे, हटके, विचित्र, भावुक, असे टॅटू शरीरावर काढून घेत असतात. पण हे टॅटू बवनणं कधी कधी लोकांच्या अंगलट येतं. एका महिलेसोबत असंच काहीसं घडलं असून तिच्या शरिरावरील टॅटूमुळे आता तिला नोकरी मिळण्यासही अडचण निर्माण होत आहे. एका 46 वर्षीय महिलेनं शरीरावर एक दोन नव्हे तर चक्क 800 टॅटू काढले. मात्र या टॅटूंमुळे आता तिला अडणींचा सामना करावा लागत आहे. या ब्रिटीश महिलेच्या 800 टॅटू बनवल्यामुळे तिला कोणी काम देत नाहीये.
द न्यूयॉर्क पोस्टनुसार , युनायटेड किंगडममधील वेल्समधील 46 वर्षीय मेलिसा स्लोएनने यापूर्वी टॉयलेट क्लिनर म्हणून काम केले होते, परंतु तिच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर टॅटू काढल्यानंतर तिला काम मिळणं बंद झालं. स्लोएनने डेली स्टारला सांगितले की, मला नोकरी मिळू शकत नाही. ‘मी जिथे राहते तिथे शौचालय साफ करण्याच्या कामासाठी अर्ज केला आणि माझ्या टॅटूमुळे त्यांनी मला नाकारलं.’ [gallery size=“full” ids=“918030”] दोन मुलांची आई असलेल्या स्लोएनने सांगितलं की, माझ्या संपूर्ण आयुष्यात मला नोकरी मिळणार नाही. मला एकच नोकरी मिळाली आणि तीदेखील फार काळ टिकली नाही. मला जर कोणत्या नोकरीची ऑफर आली तर मी आता लगेच स्विकारेल आणि जाऊन काम करेल. स्लोएनने वयाच्या 20 व्या वर्षी पहिला टॅटू काढला. आता तिच्या शरीरावर 800 टॅटू आहे. तिला टॅटू काढण्याची आवड असून सध्या तिची ही गोष्ट तिलाच महागात पडत आहे. ती टॅटू काढण्याच्या व्यसनाधीन गेली आहे. तिच्या शरीरावर जागा राहिली नाही तरी ती आता टॅटूवर टॅटू काढून घेत आहे. जगातील सर्वात टॅटू असणाऱ्या व्यक्तीचा किताब आता तिला जिंकायचा आहे.