मुंबई, 23 ऑक्टोबर : फुलपाखरं (Butterfly) कुठे दिसतात असं विचारल्यावरही आपण फुलांवर असंच म्हणून. फुलपाखरू ज्यांच्या नावातच फूल आहे. वेगवेगळ्या फुलांवर ही रंगीबेरंगी फुलपाखरं (Butterfly video) फिरताना दिसतात. पण सध्या असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) झाला आहे, ज्यात फुलपाखरं फुलांभोवती नव्हे तर चक्क एका कासवाभोवती (Turtle) फिरताना दिसली (Butterfly on turtle). फूल आणि फुलपाखराचं नातं तुम्हाला माहिती आहे. पण कासव आणि फुलपाखराचं नातं माहिती आहे का? नसेल तर हा सुंदर व्हिडीओ नक्की पाहा. यामध्ये फुलपाखरं कासवाभोवती फिरताना दिसले. व्हिडीओत पाहू शकता फुलपाखरं कासवाच्या तोंडाजवळच फिरताना दिसत आहेत. ते कासवाच्या तोंडावर बसलेले आहेत. आता ते तिथं नक्की काय करत आहेत? असा प्रश्न पडतोच. हे वाचा - OMG! पाहता पाहता चक्क हवेत उडू लागली कासवं; दुर्मिळ VIDEO पाहण्याची संधी बिलकुल सोडू नका आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी कासव आणि फुलपाखरांचा हा अद्भुत असा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटर शेअर केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये या दोघांचा नेमका काय संबंध आहे, याचीही माहिती दिली आहे.
Butterflies drinking turtle tears...
— Susanta Nanda (@susantananda3) October 22, 2021
The butterflies are attracted to the turtles' tears as the liquid drops contain salt, specifically sodium.Turtles have sodium in plenty from their carnivores diet.
🎥 Phil Torres, pic.twitter.com/ByeJfUjdI1
सुशांत नंदा यांनी आपल्या पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ही फुलपाखरं कासवाची आसवं पित आहेत. कासवाच्या डोळ्यातून निघणाऱ्या पाण्यात मीठ म्हणजे सोडिअम असतं. जे त्यांना त्यांच्या carnivores diet मधून मिळतं. त्यामुळे कासवाच्या अश्रूंकडे फुलपाखरं आकर्षित होतात. हे वाचा - WOW! सुकलेल्या पानाचं चक्क बनलं सुंदर फुलपाखरू; विश्वास बसत नाही मग पाहा हा VIDEO या व्हिडीओची माहिती मिळाल्यानंतर हा व्हिडीओ पाहायलाही अधिकच सुंदर वाटतो. जणू काही ही इवलीशी फुलपाखरं कासवाला रडताना पाहू शकत नाही. त्याच्या डोळ्यात पाणी येताच ते धावत येतात आणि त्याचे अश्रू पुसतात, असंच वाटतं. इतकं अद्भुत दृश्य कदाचित तुम्ही कधीच पाहिलं नसेल.