मराठी बातम्या /बातम्या /Viral /1 कोटीला विकला गेला बैल; तर 1 हजारात स्पर्मचा डोज, काय आहे खासियत?

1 कोटीला विकला गेला बैल; तर 1 हजारात स्पर्मचा डोज, काय आहे खासियत?

या मेळाव्यात बैल कृष्णाचीच मोठी चर्चा होती.

या मेळाव्यात बैल कृष्णाचीच मोठी चर्चा होती.

या मेळाव्यात बैल कृष्णाचीच मोठी चर्चा होती.

बंगळुरू, 14 नोव्हेंबर : बंगळुरूमध्ये 11 नोव्हेंबर रोजी चार दिवसीय कृषी मेळाव्याचं (Krishi Mela 2021) आयोजन करण्यात आलं होतं. आज मेळ्याच्या शेवटच्या दिवशी कृष्णा बैल (Krishna bull) चर्चेत होता. कृष्णाला पाहण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली होती. साडे तीन वर्षांचा हा बैल खरेदी करणाऱ्यांची पहिली पसंत ठरला आहे. बैलाचे मालक बोरेगौडा यांनी सांगितलं की, हा हल्लीकर जातीचा बैल आहे.

बंगळुरूचा हा मेळावा चार दिवसांसाठी आयोजित करण्यात आला होता. हा मेळाव्या दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतो. यंदा कृष्णा बैल लोकांचं प्रमुख आकर्षण ठरला. बैलाच्या मालकाने सांगितलं की, हल्लीकर जातीच्या बैलाचं स्पर्म म्हणजेच वीर्याची खूप मागणी असते. ते पुढे म्हणाले की, त्याच्या वीर्याचा एक डोज एक हजार रुपयांमध्ये विकला जातो. बोरोगौडानी पुढे सांगितलं की, हल्लीकर जातीच्या जितक्याही गायी आहेत त्याच्या दुधात जास्त प्रमाणात प्रोटीन असतं.

हे ही वाचा-घर सोडून 40 उंटासोबत वाळवंटात राहू लागली महिला; आता जगते असं आयुष्य

बैलाच्या मालकाने सांगितलं की, मात्र आता ही जात हळू हळू लुप्त होत आहे. कृष्णा बैलाला खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांनी हजार, लाख नाही तर कोटींची बोली लावली. बैल मालकाने सांगितलं की, मेळाव्यात एका खरेदीदाराने कृष्णा बैलाला 1 कोटी रुपयात खरेदी केली.

कृष्णाच्या लिलावाचा आनंद मालकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. बोरेगौडा यांनी सांगितलं की, कृष्णाचं वय साडे तीन वर्षे असते तरी तो मोठ मोठ्या बैलांना मागे सोडते. या मेळाव्यात सर्वसाधारण बैल एक ते दोन लाखांना विकले जातात. मात्र इतका महाग बैल विकला जात नाही. या बैलांची खासियत म्हणजे त्यांचं वजन 800 ते 1000 किलोपर्यंत असतं, आणि उंची 6.5 फूट ते 8 फूटांपर्यंत असते.

First published:

Tags: Bull attack, Samelan