मुंबई, 27 ऑगस्ट : आई जिच्या प्रेमाची तुलना जगात कुणाशीच होऊ शकत नाही. मुलांसाठी ती काहीही करू शकते आणि कोणत्याही थराला जाऊ शकते. मुलांच्या आनंदातच तिचा आनंद असतो. अगदी खाण्याचा म्हणाल तरी आई उपाशी राहते पण आपल्या मुलांना ती उपाशी ठेवत नाही. असं असताना एका आईनेच भूक लागताच आपल्याच पिल्लाला खाल्लं, यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. पण असाच धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. माणूस असो वा प्राणी त्यांच्यात आईचं प्रेम, माया, भावना सारखीच असते. प्राण्यांचे असे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. अगदी वाघ, सिंह, बिबट्या, चित्ता अशा खतरनाक प्राण्यांमध्येही आईची माया दिसून येते. हे प्राणी हिंसक असले तरी आपल्या पिल्लांवरील त्यांचं प्रेमही दिसून येतं. त्यामुळे स्वतःची भूक भागवण्यासाठी स्वतःच्याच पिल्लाला खाणाऱ्या या आईचा व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. आईच आपल्या पिल्लाला कशी काय खाऊ शकते? अशी कोणती आई अशी आहे, जी स्वतःच्याच पिल्लाला खाईल. तर हा प्राणी दुसरा तिसरा कुणी नाही तर मगर. मगरीचे शिकार करतानाचे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. मगर अगदी बिबट्ट्या, सिंह अशा खतरनाक प्राण्यांचीही शिकार करताना दिसली. पण या मगरीने तर आपल्या पिल्लाही सोडलं नाही. भूक लागताच तिने आपल्या पिल्लाचीही शिकार करून तिला खाऊन टाकलं आहे. हे वाचा - VIDEO - चारही बाजूंनी ‘मृत्यू’ने घेरलं! मगरींचं साम्राज्य असलेल्या नदीत चिमुकल्याची आयुष्यासाठी झुंज व्हिडीओत पाहू शकता एक भलीमोठी मगर पाण्यातून बाहेर आली आहे. तिने कुणाची तरी शिकार केली आहे. जबड्यात धरून त्याला गिळताना दिसते आहे. आता तिच्या जबड्यात असलेला प्राणी पाहून तुम्हालाही धक्का बसेल. कारण हा प्राणी मगरच आहे. लहान मगर मोठ्या मगरीच्या जबड्यात आहे. मगर स्वतःच्याच पिल्लाला खाताना दिसते आहे. काही सेकंदातच तिने छोट्या मगरीला गिळंकृत केलं आणि त्यानंतर ती आरामात पाण्यात बसली.
@TheDarkNatur3 ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. मगरीचं हे रूप पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. हा व्हिडीओ पाहून बहुतेकांचा स्वतःच्या डोळ्यावरही विश्वास बसत नाही आहे. हे वाचा - ‘तो’ एकटा आणि चारही बाजूंनी विषारी सापांनी घेरलं; जगातील सर्वात खतरनाक Snake Rescue Video तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.