मराठी बातम्या /बातम्या /Viral /कर्माचं फळ! सापावर गोळ्या झाडल्या पण...; पुढच्याच क्षणी त्या व्यक्तीचाच खेळ खल्लास; खतरनाक VIDEO

कर्माचं फळ! सापावर गोळ्या झाडल्या पण...; पुढच्याच क्षणी त्या व्यक्तीचाच खेळ खल्लास; खतरनाक VIDEO

सापावर गोळीबार करत त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न व्यक्तीला चांगलाच महागात पडला.

सापावर गोळीबार करत त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न व्यक्तीला चांगलाच महागात पडला.

सापावर गोळीबार करत त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न व्यक्तीला चांगलाच महागात पडला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

मुंबई, 31 जानेवारी :  जसं पेराल तसं उगवेल, जसं कर्म कराल तसं फळ मिळेल. हे तर तुम्हाला माहितीच आहे. मग ते कर्म जसं तसंच त्याचं फळही. जर ते चांगलं असेल तर चांगलं आणि वाईट असेल तर वाईट. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. ज्यात मुक्या जीवाच्या जीवावर उठलेल्या एका व्यक्तीला त्याच्या कर्माचं तिथल्या तिथं फळ मिळालं आहे. सापावर या व्यक्तीने गोळीबार गेला आणि त्याच्या पुढच्याच क्षणी त्याच्यासोबत भयंकर घडलं.

साप म्हटलं तरी कित्येकांच्या अंगाला पाणी सुटतं. पण काही लोक असे आहेत जे या खतरनाक सापाशीही पंगा घेण्याचा प्रयत्न करतात. या व्यक्तीनेही तेच केलं. त्याने सापाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पण मुक्या जीवाचा जीव घेण्याचा प्रयत्न त्याच्याच अंगाशी आली. त्याच्यासोबत असं काही घडलं ज्याचा त्याने स्वप्नातही विचार केला नसेल. व्हिडीओचा शेवट पाहूनच तुमच्याही अंगावर अक्षरशः काटा येईल.

हे वाचा - अरे बापरे! घोडा झाला 'श्वान'; CCTV मध्ये भयंकर दृश्य कैद, VIDEO पाहूनच धडकी भरेल

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता जमिनीवर एक साप फणा काढून बसलेला दिसतो आहे. त्याच्यासमोर गाडीत एक व्यक्ती बसली आहे. जिने हातात बंदूक धरली आहे. ती व्यक्ती त्या सापावर बंदुकीतून गोळ्या झाडते. एकामागोमाग अशा तीन गोळ्या ती झाडते. गोळीबारात सापाला तर काही होत नाही. पहिली गोळी लागते... दुसरी गोळी लागते... तिसरी गोळी लागताच मात्र साप संतप्त होतो आणि तो थेट त्या व्यक्तीवर झेप घेतो. साप चिडतो आणि बदला घेण्यासाठी वेगाने माणसावर हल्ला करतो.

मायक्रो-ब्लॉगिंग साइट Twitter वर "इन्स्टंट कर्मा" नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे "कोब्राशी लढण्यासाठी बंदूक आणू नका."

हे वाचा - अरे बापरे! घोडा झाला 'श्वान'; CCTV मध्ये भयंकर दृश्य कैद, VIDEO पाहूनच धडकी भरेल

वन्यजीव आणि प्राण्यांशी संबंधित अनेक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर येत असतात. यातील अनेक व्हिडिओ इतके क्युट असातत की ते पाहूनच यूजर्सचा दिवस चांगला जातो. न्यजीव प्रेमींसाठी हे व्हिडिओ एखाद्या मेजवानीपेक्षा कमी नसतात.  पण काही व्हिडिओ असेही असतात ज्यामध्ये या प्राण्यांशी माणसांचं वागणं अत्यंत घृणास्पद असल्याचं दिसतं. तसाच हा व्हिडीओ आहे, जो पाहून युझर्सचा संताप झाला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ समोर येताच त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. एका ट्विटर युजरने लिहिलं की, "तो एक निर्लज्ज आणि निर्दयी माणूस आहे.. जो एका निष्पाप, मुक्या प्राण्याला मारत आहे." दुसर्‍या वापरकर्त्याने माणसाच्या कृतीची खिल्ली उडवली आणि लिहिलं, "मानव प्राणी या ग्रहावरील सर्वात वाईट प्रजाती आहेत.. ते शांततेत जगू शकत नाहीत." तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशलम मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.

First published:

Tags: Snake, Snake video, Viral, Viral videos, Wild animal