व्हिडीओत पाहू शकता एक महिला रस्त्याने जात होती. तेव्हा तिथं तिच्यासमोर एक बैल आला. सुरुवातीला बैल तिच्याकडे पाहत उभा राहिला. महिलेने त्याच्याकडे पाहिलं तेव्हा बैल रागात आहे आणि तो आपल्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे हे तिला समजलं. त्यामुळे ती तिथून पळ काढू लागली. हे वाचा - VIDEO - भुंकत धावत आले कुत्रे आणि...; सिंह, अस्वल बनून घाबरवणं पडलं महागात पण बैलाने तिचा पाठलाग केला. बैल तिच्यामागे पळत सुटला. त्याने तिला गाठलं आणि तिच्यावर हल्ला केला. ज्या जागेवरून महिला पळत गेली तिथंच त्या बैलाने तिला मारत परत आणलं. सुरुवातीला तो तिला आपल्या शिंगांनी आणि नंतर पायांनी मारताना दिसतो आहे. भिंतीच्या कडेला एक बाईक उभी आहे, त्या बाईकच्या जवळ भिंतीच्या कडेला बैल तिला मारत नेतो. त्यानंतर तो तिला तसंच मारत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला घेऊन जातो. महिला जीवाच्या आकांताने ओरडते. मदतीसाठी याचना करते. तिचा आरडाओरडा ऐकून एक तरुणी तिथं धावत येते. ती त्या महिलेला बैलाच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करते. पण बैल तिलासुद्धा ढकलून देतो. महिलेला वाचवण्याचा तरुणीचा प्रयत्न कितीतरी वेळा अपयशी होतो. शेवटी ती कुणालातरी बोलवण्यासाठी जाते. इतक्यात तिथं काही आणखी लोक जमा होतात. लोक त्या बैलाला मारून त्याला बाजूला हटवण्याचा प्रयत्न करतात. पण बैल इतक्या माणसांनाही घाबरत नाही तो महिलेला काही सोडत नाही. शेवटी तिथून गेलेली एक तरुणी आणखी काही माणसांना आणते आणि हातात एक काठी घेऊन येते. ज्याने ती बैलाला मारून त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न करते. हे वाचा - VIDEO - थेट म्हशीलाच उचलायला गेला पण...; स्वतःला बाहुबली समजणाऱ्या तरुणाची फजिती कसंबसं करून महिलेला त्या बैलाच्या तावडीतून सोडवलं जातं. महिलेची अवस्था बैलाने अत्यंत भयंकर केली आहे. महिलेची हालचालही होत नाही आहे. ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.गुजरातमध्ये बैलाचा महिलेवर भयंकर हल्ला. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. pic.twitter.com/itCoZfOhcB
— News18Lokmat (@News18lokmat) August 10, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bull attack, Gujrat, Viral, Viral videos