जाहिरात
मराठी बातम्या / Viral / अविश्वसनीय VIDEO! माणसांसमोर जंगलाचा राजाही थरथर कापू लागला, पाहताच सिंहांनी ठोकली धूम

अविश्वसनीय VIDEO! माणसांसमोर जंगलाचा राजाही थरथर कापू लागला, पाहताच सिंहांनी ठोकली धूम

अविश्वसनीय VIDEO! माणसांसमोर जंगलाचा राजाही थरथर कापू लागला, पाहताच सिंहांनी ठोकली धूम

आतापर्यंत माणसांना सिंहांना घाबरताना तुम्ही पाहिलं असेल पहिल्यांदाच सिंहही माणसांना घाबरताना दिसले.

  • -MIN READ
  • Last Updated :

केन्या, 10 जानेवारी : सिंह म्हणजे जंगलाचा राजा (King of Jungle). ज्याच्यासमोर भल्याभल्या प्राण्यांची उभं राहण्याची हिंमत होत नाही (Lions Hunting Viral Video). बहुतेक प्राणी सिंहाशी पंगा घेत नाही आणि त्यातही सिंहांचा कळप असेल तर मग त्यांच्यासमोर जाण्याची किंवा त्यांच्याशी पंगा घेण्याचं धाडस कोणताच प्राणी करणार नाही माणसांचं तर सोडाच. पण पहिल्यांदाच माणसांना पाहून सिंहही थरथर कापू लागला आहे. माणसं समोर येताच सिंहाच्या कळपाने चक्क धूम ठोकली आहे  (Lions Afraid of Humans in Jungle Video). आतापर्यंत तुम्ही सिंहांना पाहून त्यांच्या भीतीने पळणारी माणसं, प्राणी पाहिले असतील. पण पहिल्यांदाच कोणत्या प्राण्यालाही नव्हे तर चक्क माणसांना सिंह घाबरताना दिसले. तुम्हाला हे फक्त सांगून, वाचून, ऐकून विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. खरंतर व्हिडीओ पाहूनही तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. हे कसं शक्य आहे, असाच प्रश्न तुम्हाला सतावत राहिल. सिंहाला कुणाचीच भीती वाटत नाही. जंगलातला तो सर्वात मोठा शिकारी आहे. माणूस त्याच्यासमोर गेला तर तो एका क्षणात त्याचा फडशा पाडेल. पण तरी हा व्हिडीओ पाहून तुम्ही हैराण व्हाल. हा व्हिडीओ 2011  साली युट्यूबत शेअर करण्यात आला होता. डिस्कवरीच्या ह्युमन प्लॅनेट शोमधील ही एक क्लिप व्हायर होतो आहे. हे वाचा -  जगातील सर्वात धोकादायक जमात माहिती आहे का ? जेथे लोक प्राण्यांचे रक्तही पितात व्हिडीओत पाहू शकता, सिंहांच्या कळपाने एका प्राण्याची शिकार केली आहे. त्यांच्यापासून दूर तीन माणसं बसलेली आहेत. एका झाडामागे लपून ते सिंहांना शिकार करताना पाहत आहेत. आती तुम्हाला वाटेल हे सिंहांना पाहून त्यांच्या भीतीने लपून बसली असतील तर तसं बिलकुल नाही.

सुरुवातीला ते सिंहांना शिकार करू देतात, लांबून शिकार पाहत त्यांची मजा घेतात. त्यानंतर हळूच झाडाझुडूपातून बाहेर पडत छाती ताणत सिंहांसमोर जातात. सिंहांच्या दिशेने चालू लागतात. त्यांना पाहताच सिंह आपली शिकार सोडतात आणि तिथून पळून जातात. जो तो झाडामागे जाऊन लपून बसतो. त्यानंतर आदिवासी आराम मांसाचा एक तुकडा कापून घेतात  (African Tribals Steal Food from Lions)  आणि तो आपल्यासोबत धेऊन जातात. सिंह काहीच करत नाहीत. लांबूनच ते हे सर्व पाहत असतात. जेव्हा आदिवासी तिथून जातात तेव्हा लपलेले सर्व सिंह बाहेर पडतात आणि तेव्हा आपली शिकार खातात. हे वाचा -  हा कुत्रा की मांजर? VIDEO पाहून भलेभले कन्फ्युझ; तुम्हाला तरी ओळखता येतं का पाहा सिंह ज्या माणसांना घाबरतात ती साधीसुधी माणसं नाही आहेत. आफ्रिकेतल्या केन्यातील हे डोरोबो जमातीचे आदिवासी (Dorobo tribe in Kenya, Africa). शिकारीच्या विचित्र पद्धतीसाठी हे आदिवासी ओळखले जातात. ते शक्तीपेक्षा युक्तीने आपलं काम करतात. त्यामुळेच सिंहही त्यांना घाबरतात. सिंहही त्यांच्याशी पंगा घेण्याची हिंमत करत नाही. मग तो एक सिंह असो किंवा दहा सिंह. त्यांच्यासमोर डोरोबो आदिवासी आले की ते तिथून पळून जातात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात