मराठी बातम्या /बातम्या /Viral /श्रद्धा कपूरच्या प्रसिद्ध गाण्यावर म्हशीनेही धरला ठेवा, VIDEO पाहून पोट धरून हसाल!

श्रद्धा कपूरच्या प्रसिद्ध गाण्यावर म्हशीनेही धरला ठेवा, VIDEO पाहून पोट धरून हसाल!

म्हशीचा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

म्हशीचा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

म्हशीचा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर (Social Media) तसे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. मात्र काही व्हिडीओ तुमच्या कायम लक्षात राहतात. आणि काही व्हिडीओ असे असतात की जे तुम्ही सतत पाहत राहता. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा एका म्हशीचा व्हिडीओ आहे. यामध्ये ही म्हैस नाचत असून मागे श्रद्धा कपूरचं प्रसिद्ध गाणं लावण्यात आलं आहे. अत्यंच सफाईदारपणे या व्हिडीओचं एडिटिंग करण्यात आलं असून लोक हा व्हिडीओ खूप पसंत करीत आहे.

हा व्हिडीओ पाहताना तुम्ही हसू आवरू (Funny Video) शकणार नाही, हे नक्की. (Buffalo Dance Viral on Shraddha Kapoors famous song you will laugh after watching VIDEO)

हा व्हिडीओ वाहिद खान नावाच्या व्यक्तीने शेअर केला आहे. या व्हिडीओवर छोटी श्रद्धा कपूर असंही लिहिण्यात आलं आहे. सुरुवातील ही म्हस शांतपणे उभी असते त्यानंतर ती उड्या मारायला लागले. अनेकांनी त्याच्या क्रिएटीव्हीटीचं कौतुक केलं आहे.

हे ही वाचा-वासरापेक्षाही ठेंगणी, दीड फुटांची राणी; चर्चेत आहे ही सर्वात लहान गाय

आतापर्यंत हा व्हिडीओ दोन लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून 26 हजार लाइक्स आल्या आहेत. लोक पुन्हा पुन्हा हा व्हिडीओ पाहून मजा घेत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात कोणाचंही मन दुखवायचा हेतू नसतो. तर हा विरंगुळ्याचा भाग आहे. या निमित्ताने ताणात असलेल्या अनेकांच्या चेहऱ्यावर हसू उमलटं तर खरंच व्हिडीओ सार्थकी लागला असं म्हणायला हरकत नाही.

First published:

Tags: Funny video, Shraddha kapoor, Viral video on social media