आशिष मिश्र/लखनऊ, 27 सप्टेंबर : लहान मुलांचं मुंडण केलं जातं हे तुम्हाला माहितीच आहे. ज्याला जावळ असंही म्हटलं जातं. यासाठी खास सोहळा आयोजित केला जातो. पण कधी कोणत्या प्राण्याचं मुंडण केल्याचं तुम्ही ऐकलं तरी आहे का? पण असं प्रत्यक्षात घडलं आहे. एका शेतकऱ्याने चक्क म्हशीच्या रेडकूचं मुंडण केलं आहे. इतकंच नव्हे तर त्याने लोकांना जेवणही दिलं आहे. उत्तर प्रदेशमधील या प्रकरणाने सर्वांनाच हैराण केलं आहे. हरदोई जिल्ह्यातील ही घटना. सुन्नी गावात राहणारा शेतकरी प्रमोद श्रीवास्तव. ज्याने गावातील दुर्गा देवीच्या मंदिराबाहेर आपल्या म्हशीच्या रेडकूचं मुंडण केलं आहे. अगदी माणसांच्या मुलांचं व्हावं तसं म्हशीच्या रेडकूचं मुंडण त्याने केलं आहे. बँडबाजासह वाजतगाजत थाटात त्याने रेडकूचं मुंडण केलं. इतकंच नव्हे तर त्याने गावजेवणही घातलं. हे वाचा - याचा गोंडसपणा आणि निरागसता तुम्हाला वेड लावेल, क्युट माकडाचा Video Viral म्हशीचं मुंडण करण्याचं कारण म्हणजे शेतकऱ्याने केलेला नवस पूर्ण झाला होता. त्याने आपला हा नवस फेडला. प्रमोद म्हणाला, त्याच्या म्हशीला होणारे रेडकू दोन-चार महिन्यांतच दगावत होते. ज्यामुळे तो खूप चिंतेत होता. त्यानंतर त्याने गावातील देवीच्या मंदिरात नवस केला. जर यापुढे म्हशीला होणारं रेडकू जिवंत राहिलं. तर त्याचं तिच्या मंदिरात मुंडण करेन.
हरदोई- युवक ने भैंस के बच्चे का कराया मुंडन और 300 लोगों को दी दावत वीडियो हुआ वायरल pic.twitter.com/hvFgF8RyIw
— Praveen Kumar Srivastava (@Jr_PraveenGonda) September 26, 2022
अखेरच त्याचा नवस पूर्ण झाला. जवळपास तीन वर्षांपूर्वी त्याच्या म्हशीने रेडकूला जन्म दिला. शेतकऱ्याच्या मते, देवीने त्याची साद ऐकली. रेडकू जिवंत राहिलं. त्यामुळे नवरात्रीचं औचित्य साधत त्याने आता त्याचं मुंडण केलं. @Praveenlive01 ट्विटर अकाऊंटवर याचा व्हिडीओही पोस्ट करण्यात आला आहे. हे वाचा - तुम्हाला डुक्कर आवडत नसले तरी त्यांच्याबद्दलचे हे Facts तुम्हाला आश्चर्यचकित करतील दुर्गा देवीच्या मंदिराच्या आवारात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अगदी थाटामाटात रेडकूचा मुंडण सोहळा पार पडला. तब्बल 300 लोकांना शेतकऱ्याने जेवण घातलं. गावात असा कार्यक्रम पहिल्यांदाच झाला. शेतकऱ्याने सांगितल्यानुसार यासाठी जवळपास 95 हजार रुपये खर्च झाला. या मुंडणाची चर्चा सर्वत्र होते आहे.