Home /News /viral /

अभ्यास करणाऱ्या बहिणीला भावानं असा आणला वैताग; Video पाहणाऱ्यांना आली लहानपणीची आठवण

अभ्यास करणाऱ्या बहिणीला भावानं असा आणला वैताग; Video पाहणाऱ्यांना आली लहानपणीची आठवण

नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो पाहून युजर्स त्यांच्या बालपणीच्या आठवणींमध्ये हरवून जाताना दिसत आहेत. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक खोडकर भाऊ आपल्या बहिणीला त्रास देताना दिसत आहे.

  मुंबई, 21 मे : भाऊ-बहिणीच्या नात्यात लहानपणीच्या गोड-गोड आठवणी असतात. एखाद्या घरात भाऊ-बहीण असतील तर ते घर कधीच शांत राहत नसतं. आई-वडील नेहमीच भावंडांच्या भांडणामुळे त्रस्त असतात. सोबतच भाऊ-बहीण नेहमीच कठीण प्रसंगी एकमेकांना साथ देताना दिसतात. अशा परिस्थितीत जेव्हा-जेव्हा भाऊ-बहिणीच्या खोड्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर समोर येतात तेव्हा प्रत्येकजण आपल्या बालपणीच्या आठवणींमध्ये हरवून जातो. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो पाहून युजर्स त्यांच्या बालपणीच्या आठवणींमध्ये हरवून जाताना दिसत आहेत. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक खोडकर भाऊ आपल्या बहिणीला त्रास देताना दिसत आहे. यामुळे हताश झालेली तिची बहीण तिच्या आईकडे तक्रार करण्यापूर्वी पुरावा म्हणून आपल्या खोडकर भावाचे कृत्य कॅमेरामध्ये रेकॉर्ड करते. हे वाचा - Childhood Obesity: तुमचं मूलही दिवसेंदिवस लठ्ठ होत चालंलय? आरोग्य तज्ज्ञांकडून जाणून घ्या उपाय व्हायरल होत असलेला व्हिडिओ लाड बायबल नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. जो अगोदर टिक-टॉकवर शेअर केला गेला होता. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक मुलगी तिच्या घराच्या खिडकीजवळ बसून अभ्यास करताना दिसत आहे. ती तिच्या विद्यापीठाच्या परीक्षेपूर्वी तिच्या विषयांची तयारी करताना दिसत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by LADbible (@ladbible)

  दरम्यान, खोडकर भाऊ तिला त्रास देण्यासाठी येतो आणि त्याच्या बॉलने खिडकीवर बॉल आपटवून तिला घाबरवतो. त्यानंतर तो हे सतत करत राहतो. त्यामुळे त्याची बहीण अस्वस्थ होते. त्यानंतर वैतागून ती या प्रकाराचा व्हिडिओ बनवण्यास सुरुवात करते. हे पाहून तिचा भाऊ तिथून निघून जातो. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Video viral, Video Viral On Social Media

  पुढील बातम्या