मराठी बातम्या /बातम्या /Viral /

चोरीच्या दागिन्याची माहिती देणाऱ्यास 57 कोटींचं बक्षीस जाहीर; दागिन्यांची किंमत ऐकून थक्क व्हाल!

चोरीच्या दागिन्याची माहिती देणाऱ्यास 57 कोटींचं बक्षीस जाहीर; दागिन्यांची किंमत ऐकून थक्क व्हाल!

ब्रिटिश अब्जाधीश आणि माजी फॉर्म्युला वन एक्झिक्युटिव्ह बर्नी एक्लेस्टोन यांची मुलगी, तमारा एक्लेस्टोन हिने तिचे दागिने मिळवण्यासाठी मोठं बक्षीस जाहीर केलं आहे.

ब्रिटिश अब्जाधीश आणि माजी फॉर्म्युला वन एक्झिक्युटिव्ह बर्नी एक्लेस्टोन यांची मुलगी, तमारा एक्लेस्टोन हिने तिचे दागिने मिळवण्यासाठी मोठं बक्षीस जाहीर केलं आहे.

ब्रिटिश अब्जाधीश आणि माजी फॉर्म्युला वन एक्झिक्युटिव्ह बर्नी एक्लेस्टोन यांची मुलगी, तमारा एक्लेस्टोन हिने तिचे दागिने मिळवण्यासाठी मोठं बक्षीस जाहीर केलं आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure
लंडन, 27 जुलै : चोरी झालेल्या दागिने परत मिळवण्यासाठी एका महिलेने चक्क कोट्यवधी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. जो कुणी या महिलेच्या दागिन्यांची माहिती देईल त्याला दागिन्यांच्या किंमतीपैकी 25 टक्के रक्कम बक्षीस म्हणून दिली जाणार आहे. ब्रिटनमधील या घटनेने सर्वच चकीत झाले आहेत. दागिने मिळवण्यासाठी करोडो रुपयांची ऑफर दिली जात आहे तर दागिन्यांची मुळ किंमत किती असेल असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. ब्रिटिश अब्जाधीश आणि माजी फॉर्म्युला वन एक्झिक्युटिव्ह बर्नी एक्लेस्टोन यांची मुलगी, तमारा एक्लेस्टोन हिने तिचे दागिने मिळवण्यासाठी मोठं बक्षीस जाहीर केलं आहे. तिने सांगितले की, 2019 मध्ये लंडनमधील त्यांच्या घरातून 31 मिलियन डॉलर (247 कोटी रुपये) किमतीचे दागिने चोरीला गेले होते. ब्रिटिश इतिहासातील ही सर्वात मोठी चोरी असल्याचे मानले जात आहे. आता तमाराने तिचे दागिने परत मिळवण्यासाठी 7.2 मिलियन डॉलर म्हणजेच 57.5 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. बीबीसीने यावर तीन डॉक्युमेंट्री बनवल्या आहेत. Flipkart वरील टी-शर्टमुळे सुशांत सिंहचे चाहते का झाले नाराज? ट्विटरवर #BoycottFlipkart ट्रेडिंग तमाराच्या म्हणण्यानुसार, डिसेंबर 2019 मध्ये ती पती आणि मुलीसोबत फिनलँडला गेली होती. यादरम्यान चोरट्यांनी केनिंगस्टन पासेस गार्डनमधील त्यांच्या घरात प्रवेश केला आणि सर्व मौल्यवान वस्तू चोरुन नेल्या होत्या. यामध्ये दागिने आणि घड्याळांचा समावेश होता. पोलिसांनी घरफोडी टोळीतील तीन जणांना अटक केली आणि नोव्हेंबर 2021 मध्ये तुरुंगात पाठवले, परंतु सर्बियन सरकारने चौथ्या व्यक्ती, डॅनिल वुकोविचचे सर्बियाकडे प्रत्यार्पण करण्यास नकार दिला आणि लंडनमध्ये खटला चालवता आला नाही. Snake in Flight Meal : विमानातील जेवणात 'साप'; एअर हॉस्टेसने काही घास खाल्ले आणि....; Shocking Video इन्स्टाग्रामवर बक्षीस जाहीर केले तमारा म्हणाल्या, ज्या व्यक्तीने घराची सुरक्षा व्यवस्था तोडली त्याने प्रत्येक खोलीची झडती घेतली आणि सर्व मौल्यवान वस्तू चोरल्या. त्यातही पोलिसांना आतापर्यंत यश आलेले नाही. तमाराने इंस्टाग्रामवर पोस्ट करत सांगितले की, कुणी चोरीच्या दागिन्यांची माहिती दिली तर त्याला दागिन्यांच्या किमतीच्या 25 टक्के बक्षीस दिले जाईल. हे सुमारे 7.2 दशलक्ष डॉलर म्हणजेच 57 कोटी पेक्षा जास्त असेल. चोरीच्या दागिन्यांमधून फक्त एक ईयर रिंग सापडली आहे, जी जानेवारी 2020 मध्ये स्टॅनस्टेड विमानतळावर एका महिलेकडून जप्त करण्यात आली होती.
First published:

Tags: Britain

पुढील बातम्या