अंकारा, 26 जुलै : जेवणात अळ्या, पाल सापडल्याची काही प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. सध्या अशाच एका प्रकरणाने खळबळ उडाली आहे. चक्क विमानातील जेवणात साप आढळला आहे. विमानातील एअर हॉस्टेसने प्लेनमध्ये मिळणाऱ्या जेवणात आपल्याला साप आढळल्याचा दावा केला आहे. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. टर्कीतील सनएक्स्प्रेस विमान कंपनीच्या फ्लाइटमधील ही धक्कादायक घटना असल्याचं सांगितलं जातं आहे. ही फ्लाइट 21 जुलैला टर्कीतील अंकाराहून जर्मनीच्या डसेलडोर्फला जात होती. केबिन क्रू जेवण करत होते. तेव्हा एका फ्लाइट अटेंडला जेवता जेवता जेवणात सापाचं डोकं मिळालं. भाजीमध्ये हा साप असल्याचा दावा करण्यात आला. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. हे वाचा - VIDEO - समोर फणा काढून आला कोब्रा; बाळाने खेळणं म्हणून हातात धरला आणि अवघ्या 30 सेकंदात… व्हिडीओत पाहू शकता एका डिशमध्ये काही पदार्थ शिल्लक आहे. त्यातनीट पाहिलात तर सापाचं कापलेलं डोकं दिसतं आहे.
द सनच्या रिपोर्टनुसार याबाबत प्रतिक्रया देताना एअरलाइनने इन फ्लाइट फूड सर्व्हिसबाबत लावण्यात आलेल्या आरोपात काही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. याप्रकरणी सविस्तर तपास केला जाणार असल्याचं सांगितलं. हे वाचा - VIDEO - बापरे! सर्कसमध्ये ट्रेनरवरच अस्वलाचा भयंकर हल्ला; जीव वाचवण्यासाठी धडपडला पण… तर सनएक्स्प्रेला खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या कॅटरिंग कंपनीनेही हे आरोप फेटाळले आहेत. आपण पदार्थ 280 डिग्री सेल्सियसवर शिजवतो. पण या पदार्थातील सापाचं डोकं तशा स्थितीत नाही. ते नंतर ठेण्यात आलं आहे, असा दावा केला आहे.