जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / OMG! Beauty treatment चा भयावह परिणाम; सुंदर दिसण्याऐवजी तरुणी बनली 'माकड'

OMG! Beauty treatment चा भयावह परिणाम; सुंदर दिसण्याऐवजी तरुणी बनली 'माकड'

OMG! Beauty treatment चा भयावह परिणाम; सुंदर दिसण्याऐवजी तरुणी बनली 'माकड'

सुंदर दिसण्याच्या नादात तरुणीच्या चेहऱ्याची भयावह अवस्था.

  • -MIN READ
  • Last Updated :

लंडन, 07 मार्च : आपण सुंदर दिसावं असं कुणाला वाटत नाही. सुंदर दिसण्यासाठी लोक काय काय नाही करत. विशेषतः महिला तरुणी बऱ्याच ब्युटी ट्रिटमेंट घेतात. पण काही वेळा याचे भयावह परिणाम समोर येतात. असंच सुंदर दिसण्याच्या नादात एका तरुणीने अशी ब्युटी ट्रिटमेंट घेतली ज्यानंतर ती सुंदर दिसणं सोडा उलट माकड दिसू लागली. एका ट्रिटमेंटनंतर ही तरुणी माकड नबली आहे. टिकटॉकर (TikTok star) जेडने (Jade)  आपल्या अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती खूपच विचित्र दिसत आहे. फोटो पाहून तुम्ही शॉक व्हाल आणि हसूही येईल. तरुण अगदी माकडासारखी दिसून लागली आहे. तिच्या ओठांच्या भोवतीचा भाग काळा पडला आहे, ज्यामुळे ती माकडच दिसू लागली आहे. तिच्या या भयावह चेहऱ्यामागील कारण आहे आहे, हे तिने व्हिडीओत सांगितलं आहे. हे वाचा -  …अन् Energy drink ठरलं विष; पिताच 25 वर्षांच्या तरुणाचा झाला मृत्यू तरुणीच्या अशा भयावह चेहऱ्याचं कारण आहे ते म्हणजे लिप फ्लिप ट्रिटमेंट (Lip Flip Treatment). या ट्रिटमेंटनंतर तिच्या चेहऱ्याची अवस्था अशी भयंकर झाली आहे.

News18

जेडने सांगितलं, या ट्रिटमेंटसाठी तिने तब्बल 57,743 रुपये खर्च केले होते. या ट्रिटमेंटनंतर तिच्या ओठांच्या आसपासची त्वचा बर्न झाली. ज्यामुळे तिचा चेहरा आकर्षक तर दिसला नाही पण ती एका माकडासारखी दिसू लागली. आपण Homer Simpson दिसत आहोत, असं ती म्हणाली. हे वाचा -  तरुणीच्या चेहऱ्यावर पुरुषांप्रमाणे केस; कापण्याऐवजी वाढवली दाढी, आता मोठी समस्या पण तरी आपल्या चेहऱ्याच्या अशा अवस्थेमुळे तिला बिलकुल धक्का बसला नाही. हे डाग म्हणजे ट्रिटमेंटचा भाग आहे. या ट्रिटमेंटमध्येच त्वचा बर्न केली जाते, ज्यामुळे तो भाग असा गडद रंगाचा जळल्यासारखा होतो. हळूहळू हे ठिक होतं आणि त्वचेचा मूळ रंग परत येतो. त्यानंतर ट्रिटमेंटचा परिणामाची ती प्रतीक्षा करत आहे. म्हणजे ज्यासाठी तिने ही विचित्र ट्रिटमेंट केली त्यानुसार तिचे ओठ फुलून त्यांचा आकार मोठा होणार.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात