Home /News /videsh /

झेलेन्स्कींची हत्या की पुतिन यांची जाणार सत्ता? कोणत्या परिस्थितीत युद्धाला मिळेल पूर्णविराम?

झेलेन्स्कींची हत्या की पुतिन यांची जाणार सत्ता? कोणत्या परिस्थितीत युद्धाला मिळेल पूर्णविराम?

सध्या सगळं जग तिसऱ्या महायुद्धाच्या (World War) तोंडावर उभं आहे. त्यामुळे पुतिन (Putin) यांनी युद्ध थांबवावं अशी मागणी जगभरातील लोक करत आहेत. मात्र पुतिन यांनी कोणत्याच आवाहनाला प्रतिसाद दिलेला नाही. अशा परिस्थितीत हे युद्ध कधी आणि कसं संपणार असा प्रश्न जगभरातील लोकांना भेडसावत आहे.

पुढे वाचा ...
कीव्ह, 05 मार्च: सध्या सगळ्या जगाला चिंतेच्या दरीत लोटलं आहे ते रशिया (Russia-Ukraine War) आणि युक्रेनमधील युद्धाने. रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे. युक्रेन त्याला सर्व शक्तीनिशी तोंड देण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकेसारखे (USA) देश युक्रेनच्या बाजूने उभे आहेत. हे युद्ध लवकर थांबलं नाही तर युक्रेनच्या बाजूने काही देश या युद्धात उतरतील तर काही देश रशियाच्या बाजूने. अखेर याची परिणती तिसर्‍या महायुद्धात होण्याची भीती आहे. सध्या सगळं जग तिसऱ्या महायुद्धाच्या (World War) तोंडावर उभं आहे. त्यामुळे पुतिन (Putin) यांनी युद्ध थांबवावं अशी मागणी जगभरातील लोक करत आहेत. मात्र पुतिन यांनी कोणत्याच आवाहनाला प्रतिसाद दिलेला नाही. अशा परिस्थितीत हे युद्ध कधी आणि कसं संपणार असा प्रश्न जगभरातील लोकांना भेडसावत आहे. बीबीसीच्या वतीनं या युद्धस्थितीचा, दोन्ही देशातील राजकारणाचा अभ्यास करून एक अहवाल तयार केला असून, त्यात पाच वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे वाचा-युक्रेनमधल्या नागरिकांसाठी रशियाचा मोठा निर्णय, काही तासांसाठी युद्धविराम घोषित छोटे युद्ध, तीव्र हल्ले आणि युक्रेनवर ताबा रशिया युक्रेनवर हल्ले तीव्र करून युक्रेनची राजधानी कीव्ह (Kyiv) ताब्यात घेऊन युद्ध संपल्याचं जाहीर करू शकतो. यासाठी रशिया आपल्या हवाई दलाला युद्धात उतरवून एक लहान आणि निर्णायक युद्ध लढून युक्रेन ताब्यात घेऊन युद्ध थांबल्याची घोषणा करू शकतो. युक्रेनवर ताबा मिळवल्यानंतर तेथे मॉस्को समर्थक 'कठपुतली' सरकार स्थापन केलं जाऊ शकतं. युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांची हत्या होऊ शकते किंवा ते देश सोडून जाऊ शकतात. अशा परिस्थितीत पुतिन युद्ध संपल्याची घोषणा करू शकतात. मात्र युक्रेनवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या फौजा तिथंच ठेवतील. दीर्घकाळ युद्ध युक्रेन चिकाटीने रशियाचा सामना करत असल्यानं हे युद्ध दीर्घकाळ लांबण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रशियाला कीव्हसारखी शहरं काबीज करण्यासाठी अनेक दिवस लागू शकतात. कारण पश्चिमी देश सतत युक्रेनला दारुगोळा, शस्त्रात्रं पुरवत आहेत. युक्रेनचं सैन्य रशियाच्या सैन्याला गनिमी काव्याने दीर्घकाळ लढा देऊ शकतं. 1990च्या दशकात चेचेन्यानं अशी स्थिती अनुभवली आहे. युरोपियन युद्ध आणखी एक शक्यता वर्तवली जात आहे, ती म्हणजे रशिया युक्रेननंतर इतर देशांवरही कब्जा करण्याचा प्रयत्न करू शकतात. मोल्दोवा, जॉर्जिया हे देशही त्यांच्या निशाण्यावर असू शकतात. हे दोन्ही देश नाटोचे सदस्य नाहीत. नाटोचे (NATO) सदस्य असलेले बाल्टिक देश (Baltic Countries) म्हणजे लिथुयानिया, एस्टोनिया आदी देशांमध्ये सैन्य पाठवण्याची धमकी देऊ शकतात. यामुळे रशिया आणि नाटो सदस्य देशांमध्ये मोठं युद्ध होऊ शकतं. तसं झाल्यास हे खूप धोकादायक युद्ध ठरू शकतं. मात्र याची शक्यता कमी आहे. युक्रेनमध्ये पुतिन यांना माघार घ्यावी लागली तर मात्र ते हे पाऊल उचलूही शकतात. हे वाचा-रशियानं पूर्व युक्रेनवर केलेल्या ड्रोन हल्ल्याचा LIVE VIDEO, बटालियन उद्ध्वस्त राजकीय चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न या युद्धावर राजकीय चर्चेतून तोडगा निघण्याचीही एक शक्यता आहे. संयुक्त राष्ट्रांचे (UN) महासचिव एंटोनियो गुटेरेस यांनी नुकतंच म्हटलं आहे की, आता बंदुका बोलत आहेत, मात्र चर्चेचा मार्ग कायम खुला असला पाहिजे. त्यानुसार, हे युद्ध थांबवण्यासाठी अनेक स्तरांवर चर्चा होत आहे. फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी पुतीन यांच्याशी फोनवरून चर्चा केली असून, बेलारुसच्या सीमेवर रशिया आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली आहे. चीनही हस्तक्षेप करून रशियावर युद्ध समाप्तीसाठी दबाव आणण्याची शक्यता आहे. एक कल्पना अशीही मांडली जात आहे की, युक्रेन क्रीमिआ, डोनबासच्या काही भागांवर रशियाचा अधिकार मान्य करेल आणि त्याबदल्यात पुतीन त्यांना युक्रेनचं स्वातंत्र्य आणि युरोपशी सहकार्य वाढवण्याची परवानगी देईल. हे वाचा-युक्रेनमध्ये शॉपिंग सेंटर लुटताना दिसले सामान्य नागरिक, दृश्य कॅमेऱ्यात कैद पुतिन यांना सत्तेतून व्हावं लागेल पायउतार आणखी एक महत्त्वाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे, ती म्हणजे पुतीन आपली लोकप्रियता गमावतील आणि त्यांना सत्तेवरून पायउतार व्हावं लागेल. याबद्दल, लंडनमधील किंग्ज कॉलेजातील युद्ध विषयक अभ्यासाचे प्राध्यापक सर लॉरेन्स फ्रीडमन यांनी म्हटलं आहे की, 'कीव्हमध्ये सत्ता परिवर्तनाची शक्यता जितकी आहे तितकीच ती मॉस्कोमध्ये आहे. युक्रेनमध्ये रशियाचे हजारो सैनिक मारले गेले, रशियावर अत्यंत कठोर आर्थिक निर्बंध लागले तर पुतीन यांची लोकप्रियता एकदम कमी होईल. पुतीन यांना आतापर्यंत समर्थन देणाऱ्या दोन मोठ्या व्यावसायिकांना आता पुतीन आपलं रक्षण करू शकत नाहीत अशी शंका वाटत असल्यानं ते पुतीन यांचा पाठिंबा काढून घेऊ शकतात. अशावेळी रशियात बंडखोरी होऊ शकते. ते दडपण्यासाठी पुतीन सैन्यबळाचा वापर करू शकतात. मात्र याचा परिणाम उलटा होऊ शकतो आणि त्यांच्या हातून सत्ता जाऊ शकते. पुतीन सत्तेवरून गेल्यास पश्चिमी देश रशियावर लावलेले निर्बंध काढून टाकतील.
First published:

Tags: Russia Ukraine, Russia's Putin, Vladimir putin

पुढील बातम्या